Maharashtra Weather Update Live Update : यूट्यूबर ज्योती मल्होत्राची तीन वेळा मुंबई वारी; तपासात माहिती उघड

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 21 May 2025: आज बुधवार दिनांक २१ मे २०२५, महाराष्ट्रात मॉन्सून पूर्व पावसाची हजेरी, राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Marathi News Live Updates :
Marathi News Live Updates :Saam TV
Published On

 यूट्यूबर ज्योती मल्होत्राची तीन वेळा मुंबई वारी; तपासात माहिती उघड

हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा मुंबईत देखील आल्याच समोर

काही महिन्यांपूर्वी ज्योती मुंबईत आल्याचं उघड

आतापर्यंत ज्योतीने तीनदा केली मुंबईची वारी केल्याच समोर

ट्रेन तसेच बसने ज्योती मुंबईत आल्याचे उघड

२०२३ मध्ये ऐन गणेशोत्सवादरम्यान ज्योती मल्होत्रा मुंबईत आल्याचं तपासात उघड

मुंबईत ज्योतीने चित्रित केले होते यूट्यूब चॅनेलसाठी व्हिडिओ

मुंबईतील लालबागचा राजा आणि गणेशगल्ली मुंबईच्या राजाचं घेतलं होतं दर्शन

ज्योती मल्होत्रा मुंबईला येण्यामागच्या उद्देशाचा यंत्रणांकडून तपास सुरू

Amaravati Rain : अमरावती शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी 

अमरावती शहरासह जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी...

पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ..

अमरावती शहरातील अनेक भागात रस्तावर पाणीच पाणी...

सतत येत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे देखील प्रचंड नुकसान..

काढणीला आलेल्या तिळ, कांदा, भुईमुंग खराब होण्याच्या मार्गावर..

मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता...

हवामान विभागाचा अंदाज..

Pune News : पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी

- चाकण औद्योगिक क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी

- रस्त्यांना ओढ्यांचे रुप

- रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असुन खोलवर पाण्यातून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुरु आहे

- रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यास अपघातांचा मोठा धोका..

- रस्त्यावरुन पाणी वाहत असताना प्रवास करणं टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

नागपूरमध्ये काही भागात वादळी वारा, धंतोली येथील मुख्य रस्त्यावर झाडाची मोठी फांदी कोसळली

- यामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झालाय.. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या

- नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला

- घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ पुढाकार घेत फांदी हटवण्याचे काम सुरू केले.. त्यानंतर वाहतूक सुरळीत झालीआहे

- सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मात्र, अशा घटनांमुळे शहरातील झाडांची देखरेख आणि छाटणीचे महत्त्व अधोरेखित होत आहे

जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीने केलं रौद्ररूप धारण

आगीचा भडका अधिकच वाढला, कंपनीतील परिसर रिकामा करण्यात आला

परिसरात धुराचे प्रचंड लोट

महाड विन्हेरे मार्गावर दोन ST बस समोरासमोर धडकून अपघात

महाड विन्हेरे मार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून आज संध्याकाळी या मार्गावर दोन ST बसची समोर समोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभिररित्या जखमी झाले असून इतर पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. या डांबरी रस्त्यावर वाहनांचे टायर्स स्लिप होऊन हे अपघात होत आहेत. गेल्या आठ दिवसात रोज एक दोन अपघात होत असून चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर डांबरीचा वापर केल्याने रस्ता निसरडा झाला असल्याचा आरोप होत आहे.

पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

यूपीएससीची परीक्षा देताना फसवणूक करून आरक्षणाचा लाभ घेतल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर हिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासात सहकार्य करण्याचे आदेशही तिला दिले आहेत.

लातूरमध्ये 5 जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांच धरणे आंदोलन....

लातूरच्या विभागीय कृषी उपसंचालक कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे... राज्यात कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, तसेच कृषी सहाय्यकांचे सर्व काम ऑनलाईन पद्धतीने झाल्याने लॅपटॉप देण्यात यावा यासह इतर मागण्या घेऊन , लातूर ,परभणी ,नांदेड ,धाराशिव बीड या जिल्ह्यातील कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले आहे यावेळी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कृषी सहायकांनी सहभाग घेतला होता....

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज मंदिरे आणि घाटांची स्वच्छता मोहीम

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज मंदिरे आणि घाटांची स्वच्छता मोहीम राबवली. पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र त्रिधारा येथील ओंकारनाथ मंदिरापासून येतील मंदिर व घाट स्वच्छता करण्यात आली तर . या मोहिमेत अनेक मंदिरे आणि घाटांची स्वच्छता करण्यात आली, ज्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोल्हापुरात एसबीआय बँकेच एटीएम फोडून सुमारे 7 लाखांची रोकड लंपास

एसबीआय बँकेच एटीएम फोडून सुमारे 7 लाखांची रोकड लंपास

इचलकरंजी-सांगली रोडवरील यड्राव फाट्यावरील घटना

कोल्हापूर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल

ठसेतज्ञ आणि श्वानपथकही घटनास्थळी दाखल

अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची ४ पथके रवाना

स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष तपास सुरू

धाराशिव मध्ये जोरदार पावसाला सुरूवात

धाराशिव मध्ये जोरदार पावसाला सुरूवात...

गेल्या अर्धा तासापासून शहरात तुफान पाऊस

शहरभर पाणीच पाणी , रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी साठले ,वाहतूक खोळंबली

तुळजापूर ,लोहारा परिसरात ही वादळी वाऱ्यासह पाऊस

जिल्ह्यात तीन दिवसापासून सतत जोरदार अवकाळी पाऊस

पुण्यात तरुणाचं CCTV कॅमेरा बसवण्यासाठी भीक मागो आंदोलन

पुण्यात तरुणाचं CCTV कॅमेरा बसवण्यासाठी भीक मागो आंदोलन

भीक मागत तरुण रस्त्यावर उतरला

पुण्यात तरुणाने केलं भीक मागो आंदोलन; सरकारकडे पैसे नाहीत सीसीटीव्ही कॅमेरा लावायला तरुणाने भीक मागून आंदोलन करत वेधलं पुणेकरांचं लक्ष,

बिबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये देखील भीक मागण्यासाठी गेला होता तरुण

विडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

आज दुपारी 4 वाजता आरोग्य विभागाची राज्यस्तरीय बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.

पुण्यातील नायडू रुग्णालयात आम्ही 50 बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवले आहेत.

चार वाजता होणाऱ्या बैठकीत गाईडलाईन्स येतील त्यावर त्वरित काम करणार आहोत.

आशिया खंडातील इतर देशांमध्ये जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे माहिती असली तरी पुण्यात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

गेल्या पाच महिन्यात अवघ्या चार रुग्णांचे निधन झाले होते त्या सर्वांना उपचारानंतर घरी सोडले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी दिलीय.....

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे

आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देणार, अज्ञात व्यक्तीने बाहेरच्या राज्यातून धमकीचा मेल पाठवला आहे त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून भर पावसात सातारा पोलिस आणि बॉम्ब स्कॉड पथक शोधकार्य सुरू आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांचं उद्या नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन

- मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांचं उद्या नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन

- नाशिकमध्ये ठिकठिकाणी उद्या मंत्री छगन भुजबळ यांचे होणार जोरदार स्वागत

- नाशिकच्या इगतपुरीत सकाळी ११ वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होणार जल्लोषात स्वागत

- नाशिकमध्ये दुपारी राष्ट्रवादी कार्यालय इथं देखील मंत्री छगन भुजबळ यांचे होणार जोरदार स्वागत

- नाशिकमध्ये स्वागत झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आपल्या येवला लासलगाव मतदार संघात जाणार

- मतदार संघात जाताना देखील ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या जोरदार स्वागताच नियोजन

- मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्या राष्ट्रवादी आणि भुजबळ समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने पंचगंगा नदीमध्ये प्रात्यक्षिक सुरू

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर आल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिक सुरू

अग्निशमन दलाच्या जवानांकडून बुडणाऱ्या व्यक्तीला कसं वाचवलं पाहिजे अचानक पाणी आलं तर आपली सुटका कशी केली पाहिजे या संदर्भातली प्रात्यक्षिक सुरू

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका

काँग्रेसचे जेष्ठ नेते,अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

मागच्या अनेक वर्षांपासून म्हेत्रे घराणेची काँग्रेस पक्षाशी होते एकनिष्ठ

मात्र येत्या 31 में ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये म्हेत्रे आपल्या कार्यकर्त्यांसह करणार शिवसेनेत प्रवेश

जालन्यात राहत्या घरी एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

जालन्यात राहत्या घरी एका एसआरपीएफ जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरुषोत्तम खेडेकर अस या 28 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरामध्ये पोलीस वसाहतीमध्ये राहत्या घरी या जवानाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Kalyan: कल्याण पूर्व सप्तशृंगी इमारत स्लॅब उचलून सहा जणांचा मृत्यू सहा जण जखमी

संपूर्ण इमारत रिकामी आजूबाजूच्या चाळींचा परिसर ही प्रशासनाने रिकामा केला

या रहिवाशांचे तात्पुरती कल्याण मधील नूतन ज्ञानमंदिर शाळेत राहण्याची सोय

आमच्या डोळ्यासमोर दुर्घटना घडली जखमींना बाहेर काढताना आम्ही पाहिलय

कालपासून अंगावर असलेला कपड्यांवरच आम्ही राहतोय आमचे कागदपत्र आमचा संसार त्या खोल्यांमध्ये अडकलाय

या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कृष्णा चौरसीयावर कठोर कारवाई करा

केडीएमसीने आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही

आम्हाला तात्पुरता निवारा नको तर आमचा पुनर्वसन करा अशी मागणी या नागरिकांनी केली आहे

Sangli Crime: एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा,15 ते 16 लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज

सांगलीच्या बुधगाव येथे एसबीआय बँकेचे एटीएमवर दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.यावेळी चोरट्यांकडून 15 ते 16 लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मध्यरात्रीच्या सुमारास एसबीआय बँकेचे एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आली,त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी एटीएम मशीन मध्ये एसबीआय बँकेकडून वीस लाखांची भरणा करण्यात आली होती.त्यामुळे सुमारे 15 ते 16 लाखांची रोकड एटीएम मध्ये असण्याची शक्यता पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे.

काँग्रेसच्या वतीने नंदुरबार मध्ये तिरंगा रॅलीचा आयोजन

भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात देशभक्तीचा वातावरण निर्माण झालं भारतीय सैन्य दलाने केलेल्या या कामगिरीचा कौतुक करण्यासाठी नंदुरबार काँग्रेस पक्षाचा वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आला होत स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा फोटो हातात घेत देशभक्तीपर गीत सादर करत काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदुरबार शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा राहिलेल्या जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

Pune News: हे फक्त पुण्यातच! मुसळधार पावसानंतर पठ्ठ्याने रस्त्यावर आणली होडी

काल मुसळधार पावसाने पुण्याची दणादण उडवली. काल झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या आहेत असं चित्र निर्माण झालं होतं.

यामुळेच पुणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी होणारी कामं केली आहेत का नाही असा प्रश्न उपस्थित झाला

आता प्रशासनाचा विरोध म्हणून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात थेट होडी चालवत आंदोलन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी भागात महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ पाण्यात होडी चालवून आंदोलन केलं.

या अनोख्या आंदोलनाची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे...

Nashik: नाशिकच्या मनमाडला अवकाळीचा तडाखा, सततच्या पावसाने कांदा शेतात भिजला

नाशिकच्या मनमाड परिसरात सतत अवकाळी पावसाने शेतात चाळीत साठवण्यासाठी शेतात ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजल्याने कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सारखा पाऊस कोसळत असल्याने कांदा चाळीत टाकण्यासही उसंत देत नसल्याने हा संपूर्ण कांदा आता भिजल्याने कांदा सडू लागला आहे.

त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा खराब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित कोलमडले शेतकरी अडचणीत आला आहे.

शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे.

Nandurbar Politics: नंदुरबार शहरात शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तिरंगा रॅली

भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्यानंतर देशात भारताच्या सेना बद्दल अभिमान वाटत आहे या अभिमानासाठी गावोगावांमध्ये तिरंगा रॅली काढली जात असून आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नंदुरबार शहरात तिरंगा रॅली काढण्यात आले असून या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि देशप्रेमी दिसून आलेत भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्याने पाकिस्तान सह इतर देशांना देखील भारताची ताकद कळाली आहे त्यामुळे भारतीय सेनेचे कौतुक करावं तेवढं कमी आहे यासाठी सर्वांच्या मनात देशप्रेम निर्माण होत आहे यासाठी प्रत्येक भारतीय च्या मनात भारतीय सेना बद्दल अभिमान वाटत आहे या अभिमानाला व्यक्त करण्यासाठी नंदुरबार शहरातील सीबी पेट्रोल पंप येथून तिरंगा राहिली ची सुरुवात झाली ही रॅली संपूर्ण शहरात फिरून आमदार कार्यालय येथे समाप्त झाली या रॅलीमुळे प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल प्रेमाच्या भावना समोर येत आहे भारत माता की जय अशा जयघोष करत रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी देश प्रेमी उपस्थित होते.

Nandurbar: खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची पहिल धडक कार्यवाही

कृषी विभागाच्या कार्यवाहीत 3 लाखांचे बोगस बियाणे जप्त....

बोगस बियाणे विकणाऱ्या संशितावर नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल....

प्रतिबंधीत असलेल एचटीबीटी कंपनीचे बोगस कापसाचे बियाणे केले जप्त...

बोगस बियाणे विकण्याच्या अनेक दिवसापासून सुरू होता सुरसुराट.....

Ratnagiri Rain: रत्नागिरीत पावसानं विश्रांती घेतली असली तरी तुरळक प्रमाणात पाऊस पडतोय

पुढचे तीन ते चार दिवस रत्नागिरी जिल्ह्याला अलर्ट

जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा

ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

मच्छिमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अ

जिल्ह्यातील नागरीकांनी सतर्क रहावे प्रशासनाचं आवाहन

अतिक्रमणाच्या विरोधात मुस्लिम महिलेचे सहकुटुंब आमरण उपोषण

अमरावती जिल्ह्यातील शिराळा गावात जुन्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसायाला अडथळा निर्माण झाल्याची तक्रार गावातीलच नसरीन बानो या महिलेने प्रशासनाकडे करूनही कुठलीच कारवाई होत नसल्याने नसरीन बानो यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब लहान लेकरासह आमरण उपोषण सुरु केले आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील एका राजकीय पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्य आणी त्याच्या कुटुंबियांनी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, ज्यामुळे नसरीन बानो यांच्या कुटुंबाचा येण्याजाण्याचा रस्ता आणी व्यवसाय बंद पडला आहे. प्रशासनाकडे तक्रार देऊनही कुठलीच कारवाई होत नसून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सदर ग्रामपंचायत सदस्य आणि सचिव यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे,

Sangli: भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ सांगलीत काँग्रेसची तिरंगा रॅली, शहीद जवानांना वाहिली आदरांजली

भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' कारवाईमध्ये सेनेच्या तीनही दलांनी केलेल्या कामगिरीबद्दल सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदुर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव म्हणून सांगली शहरातून काँग्रेसच्यावतीने आणि आमदार विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जोरदार तिरंगा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीमध्ये काँग्रेस नेते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भारत माता की जय, जय जवान जय किसान, शहीद जवान अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. भारतीय सैन्याने यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूरची मोहीम राबविली. दहशतवाद्यांविरोधात त्यांच्याच देशात घुसून कारवाई करत भारतीय सैन्याने अतुलनीय कामगिरी सिध्द केली. देशात भारतीय सेनेचा सर्वत्र गौरव होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढून सैन्याच्या कर्तबगारीला सलाम करण्यात आला.

जालन्यात वादळी वाऱ्यासहसह अवकाळी पावसामुळे सुरू असलेला घरकाम कोसळलं

जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून सलग वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसतो आहे.

काल जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ निवडुंग शिवारात शेतात सुरू असलेलं घराचे बांधकाम वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कोसळल आहे .

बांधकाम कोसळल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालं आहे. विष्णू वाघ असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं नाव आहे.

वाघ यांचं जाफराबाद तालुक्यातील सातेफळ निवडुंग शिवारात शेतात घराचे बांधकाम सुरू होते काल झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांचं घराचे बांधकाम  कोसळल आहे...

आजपासून अकरावीचा ऑनलाईन प्रवेश, पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेब साईट क्रॅश

दहावीचा निकाल लागून आठवडा उलटला मात्र शासनाने यंदा अकरावीचा प्रवेश हा ऑनलाइनच करावा अशी अट घातल्याने आज पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे मात्र या प्रवेश प्रक्रियेसाठी नमूद करण्यात आलेल्या वेबसाईटच पहिल्याच दिवशी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत कुठे वेबसाईट काय झाली आहे तर कुठे नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाही विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास अडचणी जात आहेत त्यामुळे पहिल्याच दिवशी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया वादात सापडली आहे. ..

Jalna: जालन्यात वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीचे पत्रे उडाले

जालन्यात वादळी वाऱ्यामुळे जाफराबाद तालुक्यातील सातेफळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एका वर्गखोलीचे पत्रे उडाले आहेत.

तर शाळेतील इतरही खोल्यांची पडझड होऊन नुकसान झाले आहेत.

जालना जिल्ह्यात काल अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. कालच्या वादळी वाऱ्यामुळे जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एका वर्गखोलीचे पत्रे उडाले आहेत.

दरम्यान नुकसानी संदर्भात सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी जाफराबाद गटशिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून नुकसानीची माहिती दिली आहे...

Beed: बीड तालुक्यातील साक्षर पिंपरी येथील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान

बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने सर्व दूर हजेरी लावली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील शिवराज नामक शेतकऱ्यांच्या शेतामधील लावलेला कांदा हा काढणीला आला होता मात्र वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्या तर शेतकऱ्यांनी सांगितला आहे 50 हजार रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती मात्र अवकाळी पावसाने होत्याच नव्हतं केला आहे या संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना फोन करून माहिती दिली मात्र कोणीही आमच्या बांधावरती फिरकले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे

Pandharpur: वादळीवारे आणि अवकाळीमुळे पंढरपुरात डाळिंब बागांचे नुकसान

वादळीवाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील 65 हेक्टर क्षेत्रावरील विविध फळ बागांना फटका बसला आहे. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

बोहाळी येथील शेतकरी अंबादास हावळे या शेतकऱ्याची जवळपास 16 एकर डाळिंब बाग जमीन दोस्त झाली आहे‌. यामध्ये सुमारे दहा टन डाळिंबाचे नुकसान झाले असून सुमारे पंधरा लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

हावळे यांची 17 एकर डाळिंब बाग आहे. डाळिंब काढणीस काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे बागेला मोठा फटका बसला आहे. जोरदार आल्या आलेल्या वाऱ्यामुळे डाळिंबाची झाडे मोडून पडली आहेत.

यावर्षी डाळिंबाला दर चांगला असल्याने हावळे यांनी डाळिंब बागेसाठी जवळपास 30 ते 40 लाख रुपयांचा खर्च केला आहे.

आता तोंडाशी आलेली डाळिंब बागेचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.

याबरोबरच पेरू, केळी या बागांचेही नुकसान झाले आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 36 गावांमध्ये नुकसान

जिल्ह्यातील लोहारा,उमरगा,तुळजापूर, कळंब,धाराशिव सह भुम मध्ये अवकाळीचा पावसाचा फटका

आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे 28 जनावरे ही दगावली

पावसामुळं 56 घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर

शासनदरबारी आतापर्यंत 296 हेक्टर नुकसानीची आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता?

नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

उरुळी कांचन येथे कंटेनर व ट्रकचा अपघात; दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी, वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा

उरुळी कांचन, येथील अत्यंत गजबजलेल्या तळवडी चौकात कंटेनर व एका ट्रकचा अपघात झाला आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावर सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय कामठे, मनोज मोहोड, अश्वजीत रत्नपारखे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा कंटेनर हा तळवाडी तळवडी चौकातून शिंदवणे रोडकडे वळत होता. यावेळी सोलापूर च्या बाजूने आलेल्या ट्रक ने कंटेनर ला जोरदार धडक दिली. यावेळी दोन्ही वाहने रस्त्यावर पडली.

दरम्यान, यावेळी पुणे- सोलापूर महामार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी वाहतूक चालकांनी मोठी गर्दी केली होती. सदरची माहिती मिळताच घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस पोहोचले. व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Washim Rain: अवकाळीचा असाही फटका, जमिनीतच भुईमूगाच्या शेंगाना फुटले अंकुर

वाशिम जिल्ह्यात परिपक्व झालेला भुईमूग काढण्यास उशीर झाल्यानं जमिनीतच भुईमूगाच्या शेंगाना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आलाय.

वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने काढणीस आलेल्या भुईमूगाला उशीर झाला त्यामुळे शेंगा परिपक्व होऊन कालावधी उलटल्याने जमिनीतच शेंगांना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत असून अवकाळीचा हा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

वाशिम जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा 5 हजार 143 हेक्टरवर झाला होता.

सध्या भुईमुगाचा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसात जिल्ह्यात अवकाळी पाऊसामुळे दुहेरी फटका बसला आहे.

सोलापूर एमआयडीसीमध्ये घडलेल्या आगीच्या दुघर्टनेबाबत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून दखल

१८ मे रोजी सोलापूर एमआयडीसी मधील टॉवेल कारखान्याला भीषण आग लागून ८ अल्पसंख्याक व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.

या घटनेसंदर्भात आयोगाचे सदस्य वसीम बु-हाण यांनी त्याच दिवशी भेट देऊन पाहणी केलेली आहे.

घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात (दुर्घटनेची कारणे आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली कार्यवाही) स्वंयस्पष्ट अहवाल आयोगास सात दिवसात सादर करण्यात यावा. असे निर्देश अल्पसंख्यांक आयोगाने दिलेले आहे.

सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना आयोगाने पाठवलं पत्र

Nashik: विजेच्या खांबावर शॉकसर्किटमुळे लागली आग

नाशिकच्या येवला शहरातील राणा प्रताप पुतळ्या परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून यावेळी स्थानिकांनी त्वरित अग्निशामक दलाला संबंधित आगीची माहिती देताच अग्निशामक दलाची गाडी दाखल होत आग आटोक्यात आणली. या खांबावर मोठ्या प्रमाणात इंटरनेटच्या वायरिंग चे जाळे असून आगीत खांबावरील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली आहे.तर शहरातील विद्युत पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे तीन रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महापालिका हद्दीतील ८३ वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. १२ मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. त्यातून ते बरेही झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. २० मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून ते लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

रत्नागिरी - जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची विश्रांती, मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण

काल दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपलं

सर्वच तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

कालच्या पावसाने ठिकठिकाणी वीज पडल्याच्या घटना

दरम्यान आजपासून पुढचे तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

घाट भागात प्रवास टाळण्याचं आवाहन

मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन

Maharashtra Weather Update Live Update : लातूर जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात

लातूर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे... तर 2 तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे... लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदी पात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढला आहे.... अनेक भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे... दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे.

Maharashtra Weather Update Live Update :: मान्सूनपूर्व पावसाचा ५६ गावांना फटका, उन्हाळी पिकांचे नुकसान

मे महिन्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे..

त्याचबरोबर उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..

आतापर्यंत जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये जवळपास ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उन्हाळी पिके आणि फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे...

या पावसामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून 12 जनावरांचा मृत्यु झालाय ..

Maharashtra Weather Update Live Update : जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा, सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त 150 जणांनी केलं रक्तदान

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सिताराम ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व तरुणांनी पुढाकार घेत बीड जिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी तब्बल दीडशे जणांनी रक्तदान केलं. यामुळे जिल्ह्यात जाणवणाऱ्या तुटवड्यात कुठेतरी आमचा मुंगीचा वाटा असेल आणि ज्याला गरज पडेल त्याला जीवदान मिळण्यासाठी रक्ताचा वापर केला जाईल तसेच वाढदिवसानिमित्त ॲम्बुलन्स सेवा देखील चालू केली आहे असं सिताराम ढोले यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Weather Update Live Update : भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा कहर.

कर्ज घेऊन भातपिकाची लागवड केली. कापणीला आलेल्या भातपिकाची येत्या चार दिवसात कापणी करून....शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं, असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं. भंडारा जिल्ह्यात काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भातपीक अक्षरश: भुईसपाट झालं.

सोलापुरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली कारवाई

- सोलापुरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली कारवाई,अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह महिला अधिकाऱ्यावर कारवाई

- सोलापुरात सोलर सिस्टिम बनवण्यासाठी आठ हजार रुपयांची मागितली होती लाच

- अतिरिक्त कार्यकारी अभियंता सह तिघा जणांनी विरोधात एसीबीची कारवाई

- अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत पांडुरंग व्हनमाने,सहाय्यक अभियंता स्वाती सदानंद सलगर आणि रक्कम स्वीकारणारा खाजगी व्यक्ती योगीनाथ म्हेत्रे यांच्यावर करण्यात आली कारवाई

- सोलर व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराकडे सोलर सिस्टिम मंजुरीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी,मीटर बसवण्यासाठी व्हनमाने आणि सलगर यांनी केली होती पाहणी

- व्हनमाने यांनी पाच हजार रुपयांची तर सलगर यांनी तीन हजार रुपयांची तक्रारदाराकडे मागणी केल्याचं झालं निष्पन्न

एकीकडे मान्सून पूर्व पाऊस.. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असला, तरी अमरावतीच्या मेळघाट परिसरात आजही पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला नाहीये.. मेळघाट परिसरात देखील पावसाची हजेरी लागली.. मात्र मेळघाट मधील खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.. विहिरीने अजूनही तळ गाठला आहे.. त्यामुळे टँकरने विहिरीमध्ये पाणी सोडले जाते.. त्यानंतर गावातील नागरिक विहिरीत दोर टाकून पाणी वर काढतात.. गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना या खडीमल गावाला करावा लागतोय.. दरवर्षी थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात.. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणीटंचाई संपवावी, अशीच मागणी अनेक वर्षापासून मेळघाटमधील आदिवासी करत आहेत.

Maharashtra Weather Update Live Update : शेगावमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

शेगाव शहरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस बरसला. दरम्यान अनेक ठिकाणी घरांची पडझड होवून झाडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

अवकाळी पावसाचा बसला फटका व्यापाऱ्यांना

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला पडून आहे कारण पाऊस पडल्यामुळे गिर्‍हाईक व्यापारीआणि पाठ फिरवली आहे

त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिऱ्हाईक नसल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांवर आणि व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात आवक 469 इतकी झाली असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माळ आलेला आहे

Maharashtra Weather Update Live Update : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

- भिवापूर तालुक्यातील चिखलापार महालगाव मांडवा बंजारा या गावांमध्ये काल अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अनेक घराचं नुकसान झाले... तेच मौदा तालुक्यातील काही भागात झाड कोसळले.

- यात चिखलापार येथील निलेश खोडे, डोमाजी राऊत, रमेश गजबे महेश सोळंके, शोभा शंभरकर यांच्या घरावरील कौवलाचे छत शतीग्रस्त झाले, तेच काहींच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेले..

- यामुळे घरात ठेवलेले अन्न धान्य सहित्याच नुकसान झालं,

- सायंकाळी नुकसान पाहणीसाठी भिवापूर सरपंच अतुल सहारे, यांनी तहसीलदार यांना माहिती दिली असता त्यांनीही महालगाव भागात पाहणी केली..

Maharashtra Weather Update Live Update : मावळात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन

मावळात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे.. चार महिने कोरडवाहू जमीन पडीत ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आली होती. या पावसामुळे नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. शेतजमीन फळणी रोटरने पेरणी करण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. सात जून म्हणजेच मिरगाच्या नंतर पेरणीला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे बळीराजा आनंदीत आहे. तर अचान अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे...

Maharashtra Weather Update Live Update : नैसर्गिक आपत्तीत संपर्कासाठी जिल्हा प्रशासन आता आत्याधुनिक सॅटेलाईट फोन वापरणार

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. नैसर्गिक आपत्तीत संपर्कासाठी जिल्हा प्रशासन आता आत्याधुनिक सॅटेलाईट फोन वापरणार आहे.. जिल्ह्यातील महसुल यंत्रणेसाठी १२ तर पोलिस प्रशासनासाठी १२ फोन आले आहेत. या सॅटेलाईट फोनचा वापर सर्व तहसील कार्यालय आणि पोलिस स्थानकात केला जाणार आहे. इमर सॅट असं याचं नाव असून, हे बीएसएनएल कंपनीचे सॅटेलाईट फोन आहेत. मोकळ्या जागेवरून काही क्षणात यावरून संपर्क करता येणार आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची हायटेक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

Maharashtra Weather Update Live Update : ठाण्यात ढगाळ वातावरण

ठाणे..काल संध्याकाळी पासून कोसळणार्‍या पावसाने आज सकाळी विश्रांती. घेतली आहे. पण आज दिवसभर पाऊस हजेरी लावणार आहे. सकाळी पासूनच ढगाळ वातावरण आहे.

Maharashtra Weather Update Live Update : दापोलीत शहरात सखल भागात साचल पाणी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा धुमाकूळ सुरु आहे या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्याच पावसात शहरातील आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाण्याचा विळखा बसला. तर काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता. शिवसृष्टी जवळील गटार या पावसात तुंबल्याने पावसाचे पाणी चक्क रस्त्यावर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवकाळी पावसातच दापोलीची बिकट परिस्थिती निर्माण झाली. नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जातेय.

Maharashtra Weather Update Live Update :सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रीपरीप

रात्रभर विश्रांती घेतलेल्या पावसाची सकाळपासून पुन्हा रीपरीप सुरू

जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची रीपरीप

तर काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित

काल संध्याकाळपासून विज गायब असल्याने नागरीकांची गैरसोय

तर पावसाच्या रीपरीपीमुळे शेतकऱ्यांची मान्सून पुर्व कामे खोळंबली

पहिल्याच दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

यवतमाळ जिल्हा परिषदेत प्रशासकीय बदली प्रक्रिया सुरू असून पहिल्याच दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यात कृषी, पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच सामान्य प्रशासन विभागाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाही, यामुळे बदली पात्र कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. जिल्हा परिषद प्रशासनाने बदलांचे वेळ पत्रक तयार केले.पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन विभागातील विस्तार अधिकारी,सांख्यिकी तीन,15 वरिष्ठ सहाय्यकांची बदली करण्यात आली.

Maharashtra Weather Update Live Update : जालन्यात जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालांचे नुकसान

जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पाहायला मिळतो . आठवड्याभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालाच नुकसान झालं आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतमालाच नुकसान जालना जिल्ह्यात झाल आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यात सात नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत तर जिल्ह्यात 87 जनावर देखील दगावली आहे. जालना जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com