उकाड्यापासून सुटका होणार! 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट; कुठे कसं असेल हवामान?

Maharashtra Today Weather Update : राज्यातील तीव्र उकाड्यानंतर दिलासा देणारी बातमी! हवामान विभागाने विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तवला असून येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा कडाका कायम राहणार आहे.
उकाड्यापासून सुटका होणार! 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट; कुठे कसं असेल हवामान?
Maharashtra Today Weather Update NewsSaam tv
Published On
Summary
  • विदर्भात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

  • हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी

  • तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले

  • इतर राज्यात उकाडा कायम

  • नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Today 29th April Weather Update News राज्यात उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेले काही दिवस उन्हाच्या चटक्यामुळे होरपळणाऱ्या विदर्भात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. मात्र इतर ठिकाणी उकाडा कायम राहणार असून मुंबई, ठाणेसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४०शी पारा असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील तापमानाने उच्चांक गाठला होता. अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला आणि वर्धा येथे ४६ अंश, तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे ४५ अंशांच्या पुढे तापमान गेले होते. उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत होते, तर शेतकरी आणि मजूर वर्गाला काम करताना विशेष काळजी घ्यावी लागत होती.

उकाड्यापासून सुटका होणार! 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट; कुठे कसं असेल हवामान?
Shocking : मोडलेलं लग्न पुन्हा जुळवण्याचं दिलं वचन; नराधम महिलेच्या घरात शिरले, संधी साधून केलं हादरवणारं कृत्य

विदर्भाबरोबरच खानदेश आणि मराठवाड्यातही मंगळवारी उष्णतेचा तडाखा कायम होता. धुळे, जळगाव, परभणी आणि वाशीम येथे तापमान ४४ अंशांपेक्षा जास्त नोंदले गेले. दरम्यान, धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी २१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उकाड्यापासून सुटका होणार! 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट; कुठे कसं असेल हवामान?
Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू शकतात. या बदलत्या हवामानामुळे तापमानात किंचित घट होऊन उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळू शकतो. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागात मात्र उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असले तरी उकाड्यात विशेष घट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळणे आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com