Maharashtra Politics: शिवसेनेचे खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार? राजकीय हालचालींमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या

Kolhapur Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभर बाकी असले तरी सर्वच पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssaam tv
Published On

>> रणजीत माजगावकर, साम टीव्ही

Kolhapur Politics News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वांनाच लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षीय पातळीवर चर्चा आणि मोर्चबांधणी सुरू आहे. अशातच कोल्हापुरातील लोकसभेच्या (Kolhapur Politics) दोन्ही जागांसंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे.

अशातच कोल्हापुरातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) येणारी निवडणूक भारतीय जनता पार्टी कडून लढवणार (Kolhapur Lok Sabha Constituency) असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे कोल्हापुरात राजकीय चर्चेना उधाण आलंय.

संजय मंडलिक भाजपच्या तिकिटावर लढणार?

लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभर बाकी असले तरी सर्वच पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि युतीमध्ये देखील दावे प्रति दावे सुरू झालेत. अशातच आता कोल्हापुरातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे भाजपमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात रंगली आहे.

Maharashtra Politics
Political News: 'माझी बहीण प्रेमाने अमिताभ बच्चन म्हणाली असेल, मनावर घेऊ नका; केसरकर यांना अजित पवार असे का म्हणाले?

धनंजय महाडिक यांचा दुजोरा

संजय मंडलिक 2019 ला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले असले तरी काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय' म्हणत मंडलिक यांचा विजय सुकर केला होता. मात्र आता अवघ्या 4 वर्षातच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून खासदार संजय मंडलिक हे भाजपकडूनच निवडणूक लढवणार असं बोललं जाते. विशेष म्हणजे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील या वृत्ताला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय.

मंडलिक यांच्यासाठी मविआची दारं बंद!

दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कोल्हापूर लोकसभेवर लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला असला तरी भाजप आणि शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच लढणार हे स्पष्ट आहे. खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सतेज पाटील यांनी देखील आमचं ठरलंय हा इतिहास झाला. आता त्यावर बोलून उपयोग नाही भविष्याकडे पाहिलं पाहिजे असं म्हणत संजय मंडलिक यांच्यासाठी महाविकास आघाडीची दारं जवळपास बंद केली आहे. (Breaking News)

Maharashtra Politics
Kolhapur News: येत्या २७ तारखेला मोठा राजकीय भूकंप? फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

मंडलिक यांचा इलेक्टिव्ह मेरिट कमी?

दरम्यान जे खासदार संजय मंडलिक यांच्याविषयी ही चर्चा सुरू आहे ते मंडलिक मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने कोल्हापूर लोकसभेच्या केलेल्या सर्व्हेत संजय मंडलिक यांचं इलेक्टिव्ह मेरिट कमी असल्याचा अहवाल आहे. त्यातच महाविकास आघाडीने त्यांच्यासाठीचे दरवाजे जवळपास बंद केल्याने भाजप किंवा शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी झगडावं लागणार आहे. (Latest Political News)

संजय मंडलिक यांचं मौन का?

दरम्यान संजय मंडलिक भाजपकडून निवडणूक लढवणार या चर्चेबाबत मांडलिक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलंय. संजय मंडलिक यांचं या विषयावरील मौन आणि खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेला अप्रत्यक्ष दुजोरा यामुळे येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com