Maharashtra Politics: शरद पवारांचा पक्ष फूटणार की सत्तेत सामील होणार? खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला सर्व प्लॅन

Sharad Pawar NCP Join NDA : महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याची चर्चा आहे. या चर्चांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar NCP Join NDA
MAHARASHTRA POLITICS: WILL SHARAD PAWAR'S NCP JOIN THE GOVERNMENT? CM FADNAVIS REVEALS KEY DETAILSSaam Tv
Published On
Summary
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांना वेग

  • जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांवर भाष्य केल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सामील होणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट देखील झाली आह. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. इतकेच नाही तरी शरद पवार गटाकडून याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar NCP Join NDA
अनधिकृत बाईक-टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले, आता 'हे' प्रमाणपत्र अनिवार्य, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

शरद पवार गटाची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांवर आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार यांच्याही पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला जातोय. लवकरच शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याचीही शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार की नाही, हे थेट सांगून टाकलं.

शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार की नाही?

दरम्यान देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी काही राजकीय भेटीदेखील घेतल्याचं सांगितलं जातंय. या दिल्ली दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना शरद पवार यांच्या पक्षाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही एक पेरलेली बातमी आहे. यात कुठलेही तथ्य नाहीये. महाराष्ट्रात एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Sharad Pawar NCP Join NDA
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

आमदार किंवा खासदारही फोडणार नाहीत

महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाहीये. आम्ही आमच्यासोबत कोणालाही जोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच पवार यांचे आमदार किंवा खासदारही भविष्यात आम्ही फोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com