Jayant Patil: जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Jayant Patil Finance Ministry: राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये (NDA) सामील होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या बैठकांनंतर जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे अर्थमंत्रीपद सोपवले जाण्याची चर्चा सुरूय.
Jayant Patil
Jayant PatilSaam tv
Published On
Summary
  • जयंत पाटील यांना राज्याचे अर्थमंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरू आहे.

  • फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  • शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना वेग आला आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याची चर्चा सुरूय. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतल्याचेही समोर आले होते. त्याचदरम्यान जयंत पाटील यांना राज्याचे अर्थमंत्रीपद मिळणार,अशा चर्चांनी जोर धरलाय. त्याच अनुषंगाने जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातंय.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्याबाबत भाष्य केलंय. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर भाष्य केलंय. एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमागे कोणतेही वेगळे राजकीय समीकरण असेल, असं वाटत नाहीये. जयंतराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी आहेत. ते सातवेळा विधिमंडळातून निवडून आले आहेत. त्यांनी दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व केले आहे. ते मुख्यमंत्र्यांना वेगळ्या कारणासाठी भेटू शकतात, असं तटकरे म्हणालेत.

Jayant Patil
Maharashtra Politics: पार्थ पवारांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी राष्ट्रावादीकडून लॉबिंग सुरू; राजकीय हालचालींना वेग

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळताहेत. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे. मात्र आता राष्ट्रवादीनेचे नेते अर्थखात्याची मागणी करत आहेत. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना अर्थखात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना अर्थमंत्रिपदावर भाष्य केलंय.

Jayant Patil
देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या सुख दुःखात पाठीशी उभं असणारं नेतृत्व: रविंद्र चव्हाण

अंधारे यांनी सांगितले की, ‘पक्ष कुठलाही असो, अजितदादांनी अर्थखातं उत्तम संभाळलं होतं. अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडे आहे. मात्र जयंत पाटील आमच्यासोबत असल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यावरून जयंत पाटील सत्तेत सामील होणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com