Maharashtra Politics : कराड अडकला, आता मुंडेंकडे मोर्चा? अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेणार का? स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar Dhananjay Munde : वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना महत्त्वपूर्ण बैठकींपासून दूर ठेवले. यावरुन त्यांनी मुंडेंकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे.
Ajit pawar Dhanajay Munde
Ajit pawar Dhanajay MundeSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अजितदादांनी मुंडेंना बीडमध्ये मोठा धक्का दिलाय. तसंच मुंबईतल्या महत्त्वाच्या बैठकीपासूनही मुंडेंना दूर ठेवलंय. दादांनी मुंडेंना नेमका कोणता धक्का दिलाय आणि कोणत्या बैठकीपासून दूर ठेवलंय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय.. त्यातच आतापर्यंत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनी चुकीच्या माणसांना बाजूला करण्याचा इशारा दिलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे असं म्हटलंय. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांनी तातडीने धनंजय मुंडेंना बोलावून घेतलं. मुंडे आणि अजित पवारांची बैठक ही केवळ 10 मिनिट चालली. या बैठकीनंतर मुंडे मुंबई सोडून परळीच्या दिशेने रवाना झाले. अजित पवारांनी आपल्या या कृतीतून मुंडेंना धक्का देणार की काय असं चित्र निर्माण झालंय, ते नेमकं कसं? पाहूयात.

अजितदादांचा मुंडेंना धक्का?

- राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना दूर ठेवलं

- चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं, अजित पवारांचं वक्तव्य

Ajit pawar Dhanajay Munde
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा निर्णय; न्यायालयीन चौकशी होणार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटेचं नाव आलं.. त्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं.. मात्र आता धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीची बीड कार्यकारिणी बरखास्त केलीय. तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जातंय.. त्यामुळे आता पाठराखण करणाऱ्या अजित पवारांनीच धनंजय मुंडेंना धक्के द्यायला सुरुवात केल्याने आता दादा मुंडेंची मंत्रिपदावरूनही हकालपट्टी करणार की पुन्हा मुंडेंना अभय देणार? याची चर्चा रंगलीय.

Ajit pawar Dhanajay Munde
Walmik Karad MCOCA : मुंडेंच्या मकोकात परळीचा आका, मालकाच्या कायद्यामुळे कराडचा करेक्ट कार्यक्रम, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com