Prakash Ambedkar News: सहयोगी राहून पाठीवर वार... प्रकाश आंबेडकरांचे संजय राऊतांवर टीकास्त्र

Prakash Ambedkar On Sanjay Raut: प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्यामध्ये वंचित स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
 Prakash Ambedkar| Sanjay Raut
Prakash Ambedkar| Sanjay RautSaam Tv
Published On

Loksabha Election 2024:

राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या युतीची शक्यता मावळल्याचे स्पष्ट दिसत आहे. काल प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्यामध्ये वंचित स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

"आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहोत. भाजपला मदत होईल, असे कोणतेही पाऊल ते उचलणार नाहीत," असे म्हणत संजय राऊत यांनी महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)- वंचितच्या युतीवर भाष्य केले होते. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी या युतीबाबतच्या चर्चेवरुन संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर?

"संजय, किती खोटं बोलणार! तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात?" असा सवाल प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपस्थित केला.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Prakash Ambedkar| Sanjay Raut
Dharashiv crime : चालकाची चलाखी! ATM मध्ये भरण्याऐवजी बॅंकेचे ₹ ८५ लाख घेऊन पळाला; कर्नाटकापर्यंत तपासचक्रे फिरली अन्...

तसेच "सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत! सिल्व्हर ओक्स येथील मीटिंगमध्ये तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला माहीत आहे! अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे ते युतीचा आभास दाखवत आहेत तर दुसरीकडे आम्हाला पदरात पाडून घेण्याचे कारस्थान करत आहेत! हे तुमचे विचार आहेत!" असेही प्रकाश आंबेडकर यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. (Maharashtra Election 2024)

 Prakash Ambedkar| Sanjay Raut
नागपूर : एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com