Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Thane Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिलाय. ठाणे शिवसेना उपप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी शिंदे गट सोडत ठाकरे गटात प्रवेश केलाय. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने तयारी सुरू केलीय.
Thane Politics
Thane political twist: Deputy Chief Ramchandra Pingulkar joins Uddhav Thackeray’s Mashal faction on polling day."Saam
Published On

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आज मतदान होत असताना ठाण्यात मोठी राजकीय उलाथापालथ झालीय. नेहमी ठाकरे गटाचे नेते आपल्या पक्षात घेत उद्धव ठाकरेंना धक्के देणाऱ्यांना शिंदेंना मोठा दणका ठाकरेंनी दिलाय. ठाण्यातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी मशाल हाती घेत शिंदे गटाला रामराम ठोकलाय.

Thane Politics
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, निवडणुकीत पैसे वाटल्याचा वैभव नाईकांचा आरोप; VIDEO चर्चेत

येत्या काही दिवसांत महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींची घोषणा होतील. मुंबई, ठाणे, पुणे अशा राज्यातील महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकीवर राज्यातील जनतेचे लक्ष असणार आहे. मुंबईसह ठाण्यात ठाकरे गट आपलं वर्चस्व काय ठेवण्याच्या दिशेने कामाला लागलाय. महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय.

Thane Politics
Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

आगामी काळात ठाणे महानगर पालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. तर ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्यातील उपविभागप्रमुखांना उद्धव ठाकरेंनी गळाला लावलंय. ठाण्यातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला.

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रेवश केला. यावेळी राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com