
सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी
मराठी माणसांचे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मराठी माणसासाठी राजकारण करणारे ठाकरे 19 वर्षांनी एकाच व्यासपीठावर सर्व शक्तीनिशी एकत्र येतायेत. आतापर्यंत कार्यकर्ते, दुसऱ्या फळीतील नेते आणि निमंत्रण पत्रिकांमुळे सोशल मीडियावरील सर्व कार्यकर्ते युती आधीच एकत्र आलेत परंतु आता विजयोत्सवात हे दोन भाऊ एकत्र येतात का ? पाहा या रिपोर्टमध्ये.
ही सुरुवात आहे. असं म्हणत ठाकरे बंधूनी पाच जुलैच्या मेळाव्यासाठी दुसरं जाहीर निमंत्रण मराठी बांधवांना दिलय. तब्बल 19 वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत मराठीचा मुद्दा रोखठोकपणे मांडणार आहेत. सरकारविरोधातली ही एकीची वज्रमुठ म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची नवी सुरुवात असल्याची चर्चाही सुरु झालीय. त्यामुळे 5 जुलैच्या विजयोत्सवाची जय्यत तयारी सुरु करण्यात आलीय. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलताना पाहायचं आहे.. तर मग ही सुरुवात आहे. असं लिहलेलं दुसरं जाहीर निमंत्रण राज आणि उद्धव ठाकरेंकडून प्रसिद्ध करण्यात आलायं.
एकीकडे पक्षप्रमुखामधला दुरावा जाहीरपणे नाहीसा झाल्यावर दुसऱ्या फळीतल्या शिलेदारांची मनही जुळल्याचं चित्र आहे. आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे दोन्ही पक्षाचे शिलेदार हातात हात घालून विजयोत्सवाची तयारी करतायत. त्यामुळे मराठी माणसाच्या मुद्द्यांसाठी पुन्हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात कणखरपणे उभा राहतोय. ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात नेमकं काय होणार? पाहूयात.
वरळी डोममध्ये सकाळी 10 वाजता विजयी मेळावा
एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही मेळाव्याचं निमंत्रण
सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता
दोन्ही पक्षाचे नेते मराठीचा मुद्दा प्रखरतेनं मांडणार
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या घोषणेची शक्यता
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या पक्षाची झालेली अवस्था पाहता वरळी डोममधला हा मेळावा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणारा ठरणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षप्रमुखांसह दुसऱ्या फळीतील नेत्याचं झालेलं हे मनोमिलन पक्षाच्या वाढीसाठी फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे. 5 जुलैच्या मेळाव्यात दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका घेतात.. यावर मनसे आणि ठाकरे सेनेचं राजकीय भवितव्य ठरणार, हे निश्चित
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.