मुंबई : यंदा आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ म्हणून सुषमा अंधारे यांना ओळखलं जातंय. पेशाने प्राध्यापक असणाऱ्या सुषमा अंधारे राजकारणात कशा आल्या? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये सध्या त्यांची गणती होते. आज आपण सुषमा अंधारे यांचा 'प्राध्यापक ते ठाकरे गटाच्या स्टार नेत्या' हा प्रवास कसा राहिला, हे सविस्तर जाणून घेवू या.
सुषमा अंधारे यांचा प्रवास
आंबेडकरी चळवळीतून सुषमा अंधारे हे नाव सर्वांच्याच परिचयाचं (Maharashtra Politics) झालं. ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी गावात झाला होता. अंधारे यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईवडिलांमध्ये वाद सुरू झाले होते. त्यामुळे आजोबांनी अंधारे यांना स्वत:कडे ठेवून घेतलं, त्यांचं पालनपोषण केलं. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी त्यांच्या नावात वडिलांऐवजी आजोबांचं नावं लावलं. आजोबांनीच त्यांना शिक्षणाचे धडे गिरवले, शाळेमध्ये प्रवेशावेळी आजोबांनी स्वत:चं नाव पालक म्हणून लावलं.
२००९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली...
सुषमा अंधारे लहाणपणापासूनच खूप हुशार आणि चाणाक्ष होत्या. त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय. त्यांनी एम ए, बीएड या पदवी संपादन केलेल्या आहेत. यासोबत सुषमा अंधारे यांनी वकिलीचेही धडे गिरवले आहेत. स्त्रीवादी अभ्यासक, (Thackeray Group Leader Sushma Andhare) राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या अशी त्यांची आज राज्यभर ओळख आहे. महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव सुषमा अंधारे यांच्यावर आहे. २००९ मध्ये सुषमा अंधारे यांनी परळी विधानसभा मतदार संघातमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. परंतु भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी अंधारेंचा पराभव केला होता.
शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे गणराज्य संघासाठी काम करत होत्या. सामान्य लोकांमध्ये आपल्या मुलभूत हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी काम करत होत्या. २००६ मध्ये सुषमा अंधारे यांनी यशदामध्ये समता सामाजिक न्याय (Sushma Andhare News) विभागाच्या उपसंचालक म्हणून काम केलं होतं. २००९ – १० मध्ये त्यांनी दैनिक लोकनायक पुणे आवृत्तीच्या संपादक म्हणून काम पाहिलं. महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.सुषमा अंधारे या सामाजिक कार्याबरोबर राजकीय दृष्ट्याही सक्रीय आहेत. २००९ मध्ये त्यांनी परळी विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.
अन् ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या बनल्या...
राजकारणात आल्यानंतर सुषमा अंधारे सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होत्या. २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी अंधारे यांनी आपल्या भाषणांनी राष्ट्रवादीच्या प्रचारसभा गाजवल्या (Sushma Andhare Journey) होत्या. त्यांना पक्ष विधान परिषदेची आमदारकी देईल, असं वाटत होतं. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याऐवजी अमोल मिटकरी यांना संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या सुषमा अंधारे यांनी २८ जुलै २०२२ रोजी शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना उपनेते पद देत महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली.
बंडखोरीच्या काळात सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. आता सुषमा अंधारे ठाकरे गटाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलंय, त्यामुळे ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.