Maharashtra Politics: 'राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित आघाडी करेल', सुजात आंबेडकर यांचे टीकास्त्र

Maharashtra Politics News: मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर हे वाशिममध्ये आले होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
Maharashtra Politics: 'राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित आघाडी करेल', सुजात आंबेडकर यांचे टीकास्त्र
Sujat Ambedkar On Raj Thackeray: Saamtv
Published On

मनोज जैस्वाल, वाशिम

Sujat Ambedkar On Raj Thackeray: मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते. ते म्हणतात आम्ही मोठे मोठे स्पीकरवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू मात्र त्याला विरोध करून राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले आहे. वाशिममध्ये एका जाहीर सभेत ते बोलत होते.

Maharashtra Politics: 'राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित आघाडी करेल', सुजात आंबेडकर यांचे टीकास्त्र
Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंकडूनच AB फॉर्म घेणार', दारात उभ्या निष्ठावंतांसाठी मुलगा सरसावला; मातोश्रीतील बैठकीतला इमोशनल मोमेंट?

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या वंचीतच्या उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर हे वाशिममध्ये आले होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते, असे म्हणत आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

"ते म्हणतात आम्ही मोठं मोठे स्पीकर लावू भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू मात्र, त्याला विरोध करून राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील. जोपर्यंत मुस्लिमांचे चार-पाच लोक निवडून जात नाहीत तोपर्यंत त्यांचं भलं होणार नाही," असेही सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले.

Maharashtra Politics: 'राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित आघाडी करेल', सुजात आंबेडकर यांचे टीकास्त्र
Pimpri-Chinchwad Crime: पती हाय का हैवान! इंजिनिअर पत्नीवर मित्रांना अत्याचार करायला सांगितलं, व्हिडीओही काढला, पतीसह चौघांविरोधात गुन्हा

यावेळी सुजात आंबेडकर यांनी महायुतीसह महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे प्रस्थापित नेते आमचा विकास करू शकणार नाहीत. आमची फक्त एकच मागणी असली पाहिजे की 15 टक्के मुस्लिम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष 15 टक्के त्यांना भागीदारी देईल, 15 टक्के उमेदवारी देईल त्यांनाच मतदान करून आपल्याला विजयी करायचा आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Maharashtra Politics: 'राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित आघाडी करेल', सुजात आंबेडकर यांचे टीकास्त्र
Maharashtra Politics : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत; पडद्यामागे काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com