कोल्हापूरात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. प्रत्येकी १ खासदार निवडून आला आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापू लागलं असताना जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी खळबळजनक विधान केलं आहे. तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात जनसुराज्य पक्ष आघाडीवर होता. तर महाराष्ट्रातील महायुतीचे 7 खासदार निवडून आले त्यातला एक खासदार जनसुराज्य पक्षाने निवडून दिलेला आहे, असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि कोल्हापुरच्या राजकारणा खळबळ माजली आहे.
विधासभा निवडणुकांसाठी येणारे 60 दिवस तुम्ही मला द्या, करवीरचा आमदार जनसुराज्यचा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जनसुराज्य शक्ती पक्ष्याची जेव्हा स्थापना झाली त्या वेळी 4 आमदार निवडून आले होते. मात्र अनेक वेळा महाराष्ट्रातल्या अनेक शक्तींना आपण शत्रू करून घेतलं, यामध्ये संघटनेचं नुकसान झालं, मात्र आमच्या भावना प्रामाणिक आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत, तुमचं पाठबळ मला अपेक्षित आहे म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे.
करवीर मतदारसंघातून संताजी बाबा घोरपडे यांची उमेदवारी जाहीर करत असून संताजी बाबा घोरपडे यांनी कोरोना कालावधीमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, चंदगड मतदारसंघात जनसुराज्य पक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये १५ जागांची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या ४ जागा आणि सांगली सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील जागा लढवण्याची तयारी केली आहे. जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपचा घटकपक्ष आहे. महाविकास आघाडी सरकाच्यावेळी सोबत येण्याचा प्रस्ताव दिलेला होता, मात्र भाजपची साथ सोडली नाही. इतर छोट्या घटक पक्षाचं माहित नाही, पण भाजपकडून अद्यापतरी वेगळी वागणूक मिळालेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.