

काँग्रेस संपलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या मानसिकतेत नाहीत- सुजय विखे
भाजपही स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करून घेत आहे.
सत्यजित स्वतंत्र आहेत, त्यांचा निर्णय ते घेतील - बाळासाहेब थोरात
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. या राजकीय भूकंपात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणारं घराणं फुटणार आहे. हो, तुमचा अंदाज बरोबर आहे, आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार सत्यजीत तांबे यांच्याविषयी बोलतोय. नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय. त्याचे कारण ठरलंय, मामा बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याविषयी केलेलं विधान.
गेल्या काही दिवसांपासून सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अधूनमधून येत होत्या. आता या चर्चांना पुन्हा एकदा पेव फुटले आहे. काही दिवसापूर्वी माजी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. काँग्रेस संपलेला पक्ष आहे. त्यामुळे तिथल्या कोणत्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या मानसिकतेत नाहीत, असं विधान सुजय विखे-पाटील यांनी केलं होतं. त्यावरून उत्तर देताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे बाबत एक विधान केलंय, ज्यामुळे तांबेंच्या भाजप प्रवेशाबाबत तर्क काढले जात आहेत.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर महायुतीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यात इतकेच नाही तर महायुतीमधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या पक्षातील नेत्यांनाही गळ घालत आहेत. दुसरीकडे भाजपही स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करून घेत आहेत. यावरून बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होत आहे. मात्र असं घडताना नवीन रक्ताला वाव देता येतो.
यावरून अंदाज बांधला जात आहे, जर सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांची काही हरकत नसेल. दुसरीकडे जरी सुजय विखे-पाटील काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये जागा नसल्याचं म्हणत तरी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील सत्यजीत तांबे बाबत खूश आहेत. तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर आम्ही आनंदाने स्वागत करू असं विधान राधाकृष्ण विखे-पाटील यांना केलंय.
बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, सत्यजीत तांबे आता स्वतंत्र आहेत. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना सगळ्या पक्षातील नेत्यांनी मतदान केलंय. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतात. ते सज्ञान आहेत, त्यांना आम्ही काही म्हणू शकत नाही. सत्यजित स्वतंत्र आहेत, त्यांचा निर्णय ते घेतील. ते सध्या अपक्ष आहेत, त्याच्या बाबत काय बोलायचं?, असं विधान थोरात यांनी विधान केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.