मयुर राणे, मुंबई|ता. २२ फेब्रुवारी २०२४
चंदीगढ महापौर पदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी विरोधकाही चांगलेच आक्रमक झाले असून भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. याच मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"जे.पी नड्डा (J. P. Nadda) यांना माझे आवाहन आहे. चंदीगडच्या निकालावरती बोला. भाजप देशातील निवडणुका कशाप्रकारे जिंकत आहे. हे चंदिगडच्या महापौर निवडणुकीने दाखवून दिले आहे. सुप्रीम कोर्टाने तुमचे एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा, तुमच्या चोऱ्या, लबाड्या उघड्या केल्या असूनही 370 पारच्या घोषणा देत आहेत, ही लोकशाहीची थट्टा आहे. तुम्ही अगोदर यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत.ते आम्ही होऊ देणार नाही," असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
"जे. पी नड्डा यांनी साधेपणाने जगा महागडे गाड्या, महागडे घड्याळ वापरू नका. सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका. मोदी करत आहेत तसे ढोग करा, असे आव्हान मुंबई दौऱ्यामध्ये केले. 100 टक्के भाजपकडे महागडी घड्याळ आहेत. 90 टक्के भाजप नेते परदेशी गाड्यातून फिरतात. मोदींच्या हातातील घड्याळाची किंमत काढा? घड्याळ वापरणे गुन्हा नाही कदाचित त्यांना घड्याळांची भीती वाटत असेल म्हणून पवारांचे घड्याळ काढून घेतले," असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"राज्यातील एकेक संस्था, महाराष्ट्रातील उद्योग गुजरात कडे वळले जात आहे .उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील. महानंदाचे चेअरमन कोण होते. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. महानंदाचे शेकडो कर्मचारी आहेत. काय केले विखे पाटील यांच्या पाहुण्यांनी? तुम्ही महाराष्ट्र सरकारची डेअरी चालू शकत नाही, खोक्याचे राजकारण बरोबर चालू आहे.." अशी टीका संजय राऊत यांनी केली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.