Sanjay Raut News: 'हे एक डाउटफुल, दोन हाफ सरकार...' मंत्रीमंडळ बैठकीवरुन संजय राऊतांची खोचक टीका

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSaam Tv
Published On

Sanjay Raut News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. तब्बल ७ वर्षांच्या कालखंडानंतर ही बैठक होत असून बैठकीसाठी सरकारकडून मोठा खर्चही करण्यात आला आहे. सरकारच्या या कार्यक्रमावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut Latest News
Banjara Teej Mahotsav 2023 : बंजारा तीज महोत्सवाला गालबाेट, 12 जण जखमी; नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी

काय म्हणाले संजय राऊत?

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर सडकून टीका केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या बॅनरवर हुतात्मांचे फोटो नाही तर ठगांचे फोटो लावले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच कार्यक्रमात मंत्र्यांची व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण होत आहे.. असेही संजय राऊत म्हणाले.

यावेळी बोलताना राऊत यांनी ही तीन ठगांची युती आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना वारेमाफ खर्च होत आहे. खाण्या- पिण्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. एक डाऊटफूल आणि दो हाफ सत्तेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

सामनामधूनही टीका...

दरम्यान, राज्य सरकारच्या कारभारावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही टीका करण्यात आली आहे. आठ महिन्यांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ६८५ शेतकरी फक्त मराठवाड्यातले आहेत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या काळातले हे चित्र विदारक आहे, मोदी हे स्वातंत्र्याचा अमृतकाल त्यांच्या पद्धतीने साजरा करत आहेत... अशा शब्दात सामनामधून हल्लाबोल करण्यात आला आहे.

Sanjay Raut Latest News
Traffic Updates: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com