Banjara Teej Mahotsav 2023 : बंजारा तीज महोत्सवाला गालबाेट, 12 जण जखमी; नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी

या जखमींमध्ये महिला मुलांसह एकूण 12 जणांचा समावेश आहे.
Banjara Teej Mahotsav 2023 Accident News
Banjara Teej Mahotsav 2023 Accident Newssaam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded Accident News : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात तीज महाेत्सवात एक दुर्देवी घटना घडली. ध्वनिक्षेपक लावलेल्या वाहनाचा ब्रेक फेल झाला अन् वाहन पुढे पुढे सरकत गेले. या घटनेत सुमारे 12 जण जखमी झाले. (Maharashtra News)

Banjara Teej Mahotsav 2023 Accident News
Nashik News : नाशकात अकराशे किलो बनावट खवा जप्त, अन्न औषध प्रशासनाची कारवाई

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे बंजारा समजाचा तीज महोत्सवाप्रसंगी घडली. या महोत्सवासाठी एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावण्यात आला होता.

Banjara Teej Mahotsav 2023 Accident News
Roha Railway Station : रेल्वेतून उतरताना ताेल गेल्याने युवकाचा मृत्यू, रोह्यात हळहळ

या वाहनाचा ब्रेक अचानक फेल झाला. परिणामी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हे वाहन पुढे सरकत गेले. त्यामुळे नागरिक जखमी झाले. या जखमींमध्ये महिला मुलांसह एकूण 12 जणांचा समावेश आहे.

सर्व जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. तसेच गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com