Roha Railway Station : रेल्वेतून उतरताना ताेल गेल्याने युवकाचा मृत्यू, रोह्यात हळहळ

दाेन्ही घटनांचा पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
jinil gujar, roha news,
jinil gujar, roha news,saam tv
Published On

- सचिन कदम / विजय पाटील

Accident News : कोकण रेल्वेच्या रोहा रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेतुन उतरत असताना तरुणाचा अपघाती मृत्यु झाला आहे. जिनील गुजर (jinil gujar roha) (वय 20, राहणार रोहा) असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

jinil gujar, roha news,
Aanna Hazare News : केवळ सरकारच नव्हे विराेधकांनी देखील 'याचा' विचार करावा : अण्णा हजारे

जिनील हा मंगला एक्सप्रेसने (mangla express) गोवा (goa) येथुन रोहा येथे येत असताना प्लॅटफॉर्मवर उतरना हि दुर्घटना घडली. रेल्वे गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरताना जिनीलचा तोल गेला.

jinil gujar, roha news,
Rajgurunagar News : लाच प्रकरणी राजगुरुनगर पालिकेेचे तीन वरिष्ठ कर्मचारी अटकेत

जिनील प्लॅटफॉर्मवर पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने ताे गंभीर जखमी झाला. जिनील यास रुग्णालयात नेत असताना वाटतेच त्याचा मृत्यु झाला. या घटनेचा (accident) अधिक तपास पाेलिस करीत आहेत.

अंकली फाट्याजवळ पाेलीस जखमी

रत्नागिरी-नागपूर मार्गावरील अंकली फाट्याजवळ मध्यरात्री चालकाचा भरधाव गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. गाडी रस्ता सोडून रस्त्याकडील शेडमध्ये घुसली. नाकाबंदीसाठी तैनात असलेला एक पोलीस अधिकारी गाडीच्या धडकेत गंभीर जखमी झाले आहेत.

एअर बॅग उघडल्याने कार चालक किरकोळ जखमी झाला असून मिरजहुन कोल्हापूरच्या दिशेने कार जात होती अशी माहिती पाेलिसांकडून मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com