Traffic Updates: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा

Mumbai-Pune Expressway Traffic Updates: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Mumbai-Pune Expressway Traffic Updates
Mumbai-Pune Expressway Traffic UpdatesSaam TV
Published On

Mumbai-Pune Expressway Traffic Updates: गणेशोत्सवासाठी अनेकजण आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर देखील मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. (Latest Marathi News)

Mumbai-Pune Expressway Traffic Updates
Sambhajinagar News: मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; शहरानंतर आता जिल्ह्यांचीही नावे बदलली

एकीकडे वीकेंड आणि दुसरीकडे गणेशोत्सवाचा सण अगदी दोन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. मुंबईसह उपनगरात असलेले चाकरमानी गणेशोत्सासाठी कोकणात जाण्यासाठी निघाले आहेत.

त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Pune-Mumbai Expressway) मोठी वाहतूक कोंडी होत आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. या कोंडीमुळे वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.

त्यामुळे आनंदात गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांना प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून सध्या ही कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या महामहामार्गावरील सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजे ‘एमएसआरडीसी’ महत्वाचे पाऊल उचलले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी हा मार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार आहे.

Edited by - Satish Daud

Mumbai-Pune Expressway Traffic Updates
Cabinet Meeting: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com