विकास काटे, साम टीव्ही मुंबई
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी आता मनसे आणि ठाकरे गटात जुंपल्याचं दिसत आहे. काल उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे सैनिकांनी गोंधळ घातला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही मनसै सैनिकांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर आता राज ठाकरे यांनी ताब्यात घेतलेल्या मनसे महिला कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉल केलाय. त्यांनी अटक केलेल्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं कौतुक केल्याचं समोर आलंय.
राड्यानंतर राज ठाकरेंचा मनसे सैनिकांना व्हिडीओ कॉल
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील राड्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एकुण २० मनसे सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने काल शिवसंकल्प अभियान सुरू होते. तेव्हा ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना विरोध करत मनसे सैनिकांनी तुफान राडा केला होता. या प्रकरणी २० जणांवर गुन्हे दाखल झाले (Thane Police Arrested MNS Activist) आहेत, तर अजुन काही जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
वाद आणखीनच पेटण्याची चिन्हे
ठाण्यात काल ९ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंचा मेळावा होता. परंतु मनसे सैनिकांच्या गोंधळामुळे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला गालबोट लागले. यावरून आता ठाकरे गट आणि शिवसैनिकांकडून (Rada In Uddhav Thackeray Melava) मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. तर राज ठाकरेंनी राडा केलेल्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं कौतुक केल्याची देखील माहिती मिळतेय. त्यामुळे आता वाद आणखीनच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
बॅनरवरुन जोरदार राडा
ठाण्यातील दमानी इस्टेट या ठिकाणी रात्री पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बॅनर लावण्यात आले आहेत. काल उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हे बॅनर उतरविण्यात आले ( Raj Thackeray Video Call) होते. आज पुन्हा त्याच ठिकाणी बॅनर दिसून येत आहे. काल याच बॅनरवरुन दिवसभर राडा सूरू होता. तर रात्री पुन्हा कोणीतरी हे बॅनर लावले आहेत. यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा वातावरण तापण्याची चिन्हे दिसत (Maharashtra Politics) आहेत. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यात देखील मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.