Maharashtra Politics : बोगस मतदारांच्या आरोपावरून थोरातांनी विखेंवर केला हल्लाबोल, नगरचे राजकारण पुन्हा तापलं

Bogus Voting Shirdi : बोगस मतदानावरून महाराष्ट्रात काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Bogus Voting Shirdi  : बोगस मतदारांच्या आरोपावरून थोरातांनी विखेंवर केला हल्लाबोल, नगरचे राजकारण पुन्हा तापलं
Maharashtra Politics saam tv
Published On
Summary
  • राहुल गांधींच्या बोगस मतदानाच्या आरोपानंतर महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण.

  • बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघातील मतदार नोंदणी घोटाळ्याचा आरोप केला.

  • राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर बेताल वक्तव्याचा आरोप करून पलटवार केला.

  • निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप, प्रकरणात वादंग वाढण्याची शक्यता.

बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील महाराष्ट्रासह विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आणि देशात लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने निवडून आल्या का? असा प्रश्न उपस्थित करत विखे पाटलांनी राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?

राहुल गांधी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील महाराष्ट्रातील मतदार नोंदणी घोटाळा बाबत आरोप केले आहेत. बाळासाहेब थोरात म्हणाले, "राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे आवश्यक आहे. मात्र चोरी ओळखली गेल्याने भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला आहे. मूळ विषयाला बगल देऊन उलट सुलट बोलणे मुख्यमंत्री पदाला शोभणारे नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने निरनिराळे फंडे वापरले.. निवडणूक आयोगाने डिजिटल सॉफ्ट कॉपी दिली असती तर अनेक मतदारसंघाची तपासणी करता आली असती." असे थोरात म्हणाले.

Bogus Voting Shirdi  : बोगस मतदारांच्या आरोपावरून थोरातांनी विखेंवर केला हल्लाबोल, नगरचे राजकारण पुन्हा तापलं
Rahul Gandhi : जनता काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे मागतंय, म्हणून निवडणूक आयोगानं...; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

तसेच ते पुढे म्हणाले, "राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सहा महिने बारकाईने अभ्यास करून हा सगळा प्रकार समोर आणला आहे. निवडणूक आयोगाने भाजपला मदत करण्यासाठी हेतुपरस्पर अनेक गोष्टी केल्या आहेत. हा लोकशाहीला खरा धोका आहे. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली ती दिली गेली नाही. आमच्या मनातही अनेक शंका आहेत. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही. " असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

Bogus Voting Shirdi  : बोगस मतदारांच्या आरोपावरून थोरातांनी विखेंवर केला हल्लाबोल, नगरचे राजकारण पुन्हा तापलं
Rahul Gandhi : एक सच्चा भारतीय असं बोलू शकत नाही; भारतीय लष्करावरील टिप्पणीवरून सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना फटकारलं

राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. विखे पाटील म्हणाले, " राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बेताल वक्तव्य करत आहेत. तेलंगणात त्यांचे सरकार आल्यावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला का? कर्नाटकचे काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आले का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने मिळाल्या का? " असे ते म्हणाले

Bogus Voting Shirdi  : बोगस मतदारांच्या आरोपावरून थोरातांनी विखेंवर केला हल्लाबोल, नगरचे राजकारण पुन्हा तापलं
Rahul Gandhi: मेक इन इंडिया नाही, 'इम्पोर्ट फ्रॉम चायना"; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल|VIDEO

पुढे विखे पाटील म्हणाले, " लोकांना यांचा खरा चेहरा समजल्याने त्यांना विधानसभेला यश मिळाले नाही. लोकांनी महाविकास आघाडीला धुडकावून लावले. अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले, याला तुम्ही बोगस मतदान म्हणणार असाल तर हा मतदारांचा अपमान आहे. राहुल गांधी भारतात कमी आणि परदेशात जास्त बोलतात. बोगस मतदानाबाबत शपथपत्र केले तर आरोप सिद्ध करावे लागतील. तसेच राहुल गांधींवर गुन्हा दाखल होऊन सदस्यत्व रद्द होऊ शकते. बेताल वक्तव्याने जनतेचे मनोरंजन होईल मात्र राहुल गांधींना कुणीही गांभीर्याने घेत नाही." असा पलटवार विखे पाटलांनी केला आहे. दरम्यान आता महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या पद्धतीचं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com