Ajit Pawar News: अजित पवार सातारकरांना दिलेला शब्द पाळणार! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा शिलेदार जवळपास निश्चित; बैठकीय काय ठरलं?

Maharashtra Politics News: झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधु नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
VIDEO: 'घाणेरड्या राजकारणात अडकू नका, भाषणबाजी करणाऱ्यांपासून जपून', अजित पवारांचा जनतेला संदेश, विरोधकांवर घणाघात
Ajit Pawar Latest News: Saamtv
Published On

सुनिल काळे| मुंबई, ता. २० ऑगस्ट २०२४

लोकसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे तिकीट कुणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच काल झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधु नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

राज्यसभेची लॉटरी कोणाला?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उद्या राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यसभेच्या दोन जागांवर कोणाला संधी द्यायची? याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाची काल रात्री महत्वाची बैठक पार पडली. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

अजित पवार दिलेला शब्द पाळणार!

या बैठकीमध्ये राज्यसभेसाठी नितिन पाटील यांच्यासह भुजबळ कुटुंबियांतून एक, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा झाली. यावेळी राज्यसभेची राष्ट्रवादीच्या वाटेची एक जागा साताऱ्याचे नितीन पाटील यांना देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार हे दिलेला शब्द पाळणार का? याबाबतचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.

VIDEO: 'घाणेरड्या राजकारणात अडकू नका, भाषणबाजी करणाऱ्यांपासून जपून', अजित पवारांचा जनतेला संदेश, विरोधकांवर घणाघात
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? शिवसेना नेत रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली

कोण आहेत नितीन पाटील?

नितीन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ आहेत. तसेच ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडे घ्यावी अशी मागणी केली जात होती. मात्र भारतीय जनता पक्षाने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. यावेळी अजित पवार यांनी साताऱ्याची जागा निवडून आणल्यास नितीन पाटीलला खासदार करतो असा शब्द केला होता. त्यामुळे आता नितीन पाटील यांच्या गळ्यात राज्यसभेची माळ पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

VIDEO: 'घाणेरड्या राजकारणात अडकू नका, भाषणबाजी करणाऱ्यांपासून जपून', अजित पवारांचा जनतेला संदेश, विरोधकांवर घणाघात
Pune Crime: सासरच्या मंडळींकडून त्रास अन् अपमानास्पद वागणूक, जावयाने आयुष्य संपवलं; पुण्यातील खळबळजनक घटना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com