Aditya Thackeray News: 'भाजपापुरस्कृत खोके सरकार..' आदित्य ठाकरेंचे CM शिंदेंवर टीकास्त्र; म्हणाले...

Maharashtra Politics: खोके सरकारच्या VVIP लोकांची वेळ मिळत नसल्याने पुण्यातील विमानतळ टर्मिनल उदघाटनापासून वंचित राहिलंय.." असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
Aditya Thackeray Latest News
Aditya Thackeray Latest Newssaam tv

Aditya Thackeray News:

राजधानी मुंबईमधील दिघा रेल्वे स्टेशनचे काम पुर्ण झाले आहे. मात्र संपूर्ण काम होऊनही जवळपास ८ महिन्यापासून उद्धाटन विना जैसे थे अवस्थेत आहे. ते लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सही अभियान राबवण्यात आले. या अभियानावेळी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. हे स्थानक लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता ठाकरेंनी ट्वीट करत पुणे विमानतळही लवकर सुरू करण्याची मागणी करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत आदित्य ठाकरे?

"MTHL, दिघा रेल्वे स्थानकप्रमाणे उद्घाटनासाठी वेळ नसल्याने पुण्यातील विमानतळ टर्मिनल सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. गेले चार महिन्यांपासून टर्मिनल तयार आहे. परंतु, खोके सरकारच्या VVIP लोकांची वेळ मिळत नसल्याने पुण्यातील विमानतळ टर्मिनल उदघाटनापासून वंचित राहिलंय.." असा टोला आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी लगावला आहे.

"केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्रावर इतका अन्याय का होतो? असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. याशिवाय, वर्षभरापासून पुण्याला लोकसभेत प्रतिनिधित्व नाही... फक्त महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीला जागा गमावण्याची भीती असल्याची," टीका देखील आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray Latest News
Pune By Elections: पुणे लोकसभा पोटनिवडणूक: उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

पुणे लोकसभा पोटनिवडणूकीला पुर्णविराम!

भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या ९ महिन्यांपासून पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. महिनाभरापुर्वी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्या.. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

Aditya Thackeray Latest News
Raigad Lok Sabha: रायगड लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा; तटकरेंची दिल्लीवारीची तयारी, कुणाला मिळणार तिकीट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com