Rohit Pawar: अजितदादांच्या आमदारांना विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी लागणार, आमदार रोहित पवारांचं मोठं विधान

Rohit Pawar Criticized Ajit Pawar Group: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. त्यांनी जे साहेबांना सोडून गेले, त्यांना विधानसभेत राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल, असा टोला लगावला आहे.
रोहित पवार
Rohit PawarSaam Tv

रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई

अजितदादांच्या आमदारांना विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी लागणार, असं मोठं विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज केलं आहे. जे नेते साहेबाना सोडून गेले, त्यांना व्यक्तिगत खूप काही मिळालं आहे. प्रफुल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट दिलंय. ईडीने त्यांची प्रॉपर्टी सोडवली, जी अटॅचड केली होती. त्यामुळं मंत्रिपद मिळालं नाही, तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळालं असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय.

आता जे साहेबांना सोडून गेले आता त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना लढावं लागेल, असं रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं आहे. राज्यातले नेते समजूत काढण्याचं काम करू शकतात, बाकी त्यांच्या हातात काहीच नाही. प्रफुल पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत हात धुवून घेतले आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त फायदा प्रफुल पटेल यांचा झाला असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. फुटलेला राष्ट्रवादी पक्ष हा आता अजित पवार यांचा राहणार नाही. आता तो भाजपचा होणार, कारण एकही मंत्रिपद त्यांना मिळालं नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलं (Rohit Pawar Criticized Ajit Pawar Group) आहे.

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी केंद्राकडून आपल्या राज्यातल्या लोकांसाठी काही गोष्टी मागितल्या आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काहीच मागितलं नसल्याचं रोहित पवार म्हणाले (Maharashtra Politics) आहेत. श्रीकांत शिंदेंवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, जर श्रीकांत शिंदे यांना मंत्र पद मिळत नसेल तरी त्यांच्या पक्षाच्या खासदार आणि राज्यातल्या आमदारांना त्यांचंच म्हणणं ऐकावं लागेल.

रोहित पवार
Ajit Pawar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं ते विधान महागात पडलं; अजित पवारांची पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी

अदानी आणि शरद पवारांच्या भेटीवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, काल अदानी भेटले. उद्या अंबानी भेटतील, टेस्लाचे प्रमुख भेटतील. याचा अर्थ काही वेगळा काढता येत नाही. अदानी मोठे बिझनेसमन आहेत. गुजरातला सगळे प्रकल्प जात आहेत. काही प्रकल्प महाराष्ट्रात आणले जावे, यासाठी देखील पवार साहेब त्यांना भेटले असतील. पालकमंत्र्यांचे (Ajit Pawar) पुणे शहरात लक्ष नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. याचे उत्तर पुणेकर विधानसभेच्या निवडणुकीत देतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

रोहित पवार
Special Report: बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती? Ajit Pawar चेकमेट CM पदाचं बंद झालं गेट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com