Sharad Pawar News: शेतकऱ्यांसाठी काय केलं? PM मोदींच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर; निर्णयांची यादीच वाचली...

Sharad Pawar On Pm Modi: नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल करत पवारांवर नाव न घेता टीका केली होती.
PM Narendra Modi And NCP Chief Sharad Pawar
PM Narendra Modi And NCP Chief Sharad Pawar saam tv
Published On: 

Sharad Pawar News:

दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल करत पवारांवर नाव न घेता टीका केली होती. पंतप्रधान मोदींच्या या टीकेनंतर आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले असून पंतप्रधानांचे वक्तव्यं वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे सांगत आपल्या कृषीमंत्री काळातील घेतलेल्या निर्णयांची यादीच त्यांनी वाचून दाखवली.

काय म्हणाले शरद पवार?

"मोदींनी (PM Narendra Modi) साईंबाबांचं दर्शन केल्यानंतर माझ्याबाबत काही मुद्दे मांडले. पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे‌ पद आहे. त्यामुळे माहिती देताना नीट द्यायला हवी. त्यांचे आरोप वस्तुस्थितीपासून दूर होते..." असा टोला शरद पवार यांनी लगावला.

यावेळी पुढे बोलताना शरद पवार यांनी आपल्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळातील निर्णयांची यादीच वाचून दाखवली. "२००४ ते २०१४ या कालावधीत मी देशाचा कृषिमंत्री होतो .मी पदभार घेतल्यानंतर अमेरिकेतून गहू आयात करावा लागला. गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस यांच्या हमीभावात दुप्पट वाढ केली."अनेक महत्वांकाशी कार्यक्रम या काळात मी हाती घेतल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी पुढे बोलताना "आपल्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात ६२ हजार कोटींची कर्जमाफी केली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मोठे निर्णय घेतले या शेतकरी हिताच्या निर्णयांमुळेच आयात करणारा देश निर्यात करणारा झाला.." असेही शरद पवार म्हणाले.

"२०१५ मधील भाषणांमध्ये खुद्द नरेंद्र मोदींनीच माझ्या कामाचे कौतुक केले होते, असे म्हणत पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. त्यांच्यावर टीका करणार नाही, मात्र पंतप्रधानांची वक्तव्ये वास्तव्यावर आधारित असावीत.." असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. (Latest Marathi News)

PM Narendra Modi And NCP Chief Sharad Pawar
Maharashtra Politics: अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार, आम्ही कामाला लागलोय; बड्या नेत्याचं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.