Maharashtra Politics: 'काहींना श्रीखंड तर काहींना पिठलं...', निधीवाटपावरून जितेंद्र आव्हाड यांचा महाविकास आघाडीतील कोणाकडे रोख?

Maharashtra Politics Jitendra Awhad: अधिवेशनात सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्ष नेते विजय पाटील यांनी संबोधित केलं. दरम्यान आव्हाडांना संधी मिळताच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मात्र महाविकास आघाडीमधील खास करून काँग्रेसमधील नेत्यांना निधी मिळाल्याचा संताप व्यक्त केला.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

एकीकडे निवडणुकांना समोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी आम्ही एकत्र असल्याचा दावा करतेय. दुसरीकडे मात्र अधिवेशनात महाविकास आघाडीतील काही नेत्यांना निधी मिळाला असतांना, एकही रुपयांना न मिळाल्याने जितेंद्र आव्हाड यांनी एकत्र असतांना तो निधी घ्यायला हवा होता, असं म्हणत काहींना श्रीखंड पुरी मिळाली, आमच्या हाती मात्र काहीच लागलं नाही असा सूर धरत महाविकास आघाडीमधील नेत्यांवरच संतापले आहेत.

अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्ष नेते विजय पाटील यांनी संबोधित केलं. दरम्यान आव्हाडांना संधी मिळताच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मात्र महाविकास आघाडीमधील खास करून काँग्रेसमधील नेत्यांना निधी मिळाल्याचा संताप व्यक्त केला. हे सगळं विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत असताना आव्हाड बोलत होते. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी प्रेस आटोपती घेतली.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Chandrashekhar Bawankule News: मुख्यमंत्र्यांकडे सगळे रिपोर्ट असतात त्याआधारेच बोलले असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड यांनी आजही तो सूर धरून ठेवला. वरिष्ठ नेत्यांनी सगळ्या गटाची काळजी घेतली पाहिजे. फूट पाडण्याचं हे साधन झालंय त्यामुळे पन्नास खोके. शिवसेना उबाठा गटाला पैसे मिळाले नाहीत, शरद पवार गटाला पैसे मिळाले नाहीत, मग उरलं कोण असा प्रश्न करताना त्यांचा रोख सरळ काँग्रेसवर दिसून आला. मी कुणाच्या बापाला भीत नाही म्हणून बिंदास बोलतोय. पण मी नाव सांगणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र रोख काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरच दिसून आला. त्यामुळे महाविकास आघाडीत यामुळे बिघाडी होईल का? याची चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics
Vijay Wadettiwar News: 'तारीख पे तारीख दिली, आता शब्द पाळावा..' विजय वडेट्टीवार यांचा सरकावर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com