पराग ढोबळे, नागपूर | ता. २१ डिसेंबर २०२३
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपायला अवघे २ दिवस उरलेत. २४ डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास मराठा आंदोलक मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र सरकारकडून पुन्हा डेडलाईन वाढवून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. याच पाश्वभूमीवर सरकारने दिलेला शब्द पाळावा, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
"संविधानीक दृष्ट्या मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकत नाही. मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण देऊ शकत नाही. सरकारने तारीख पे तारीख दिली आणि स्वतःवर संकट ओढावून घेतले. आता दिलेला शब्द पाळा.." असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनावरुनही राज्य सरकारवर निशाणा साधला. "अधिवेशनात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते. आम्ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. पण सरकारला विदर्भासाठी पॅकेज द्यायचं नव्हते..." असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
अजित पवारांवर टीका...
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवरही (Ajit Pawar) निशाणा साधला. "अजित दादा स्वत: गेल्यानंतर दुसऱ्याबद्दल संशय निर्माण करण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहे. सत्ता जाते असे दिसत असल्याने कॉंग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचा धंदा दादानी बंद करावा..." अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.