MLA Disqualification Case: आमदार अपात्रता याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी

Maharashtra Politics: शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseSaam Digital
Published On

आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. परस्परविरोधी करण्यात आलेल्या ३४ याचिका दाखल करण्यात आल्या असून या याचिका सहा गटात वर्गिकरण करण्यात आल्या आहेत. यातील प्रमुख याचिकांवर उद्या एक वाजता सुणावणी होणार आहे.

MLA Disqualification Case
Maratha Reservation : राज्यभरात राज्यात १३९ गुन्हे दाखल; ३ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद: पोलीस महासंचालक रजनीश सेठ

आमदार अपात्रता याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यास शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला होता. प्रत्येक आमदाराची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे होते.तसेच पुरावे सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. याला ठाकरे गटाच्या वकिलांनी विरोध करत सुनावणी लवकरात लवकर घेऊन निकाल देण्याची मागणी केली होती. विधानसभा अध्यक्षांसमोर या मुद्यावर १३ ऑक्टोबरला सुनावणी झाली होती.

MLA Disqualification Case
Remove Ink From Clothes: कपड्यांवरचे पेनाचे डाग काढण्यासाठी सिक्रेट टिप्स

दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या परस्परविरोधातील आमदार अपात्रता याचिकांवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राहुल नार्वेकर यांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार राहुल नार्वेकर दिल्लीला जाऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार असल्याची माहिती होती.

MLA Disqualification Case
Pandharpur News: मराठा आंदोलकांनी अडवली कार; आमदार शहाजी पाटलांनी मागितली आंदोलकांची माफी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com