Malvan: मालवणमध्ये मध्यरात्री राडा, कारमध्ये आढळले दीड लाख; भाजपच्या ३ नेत्यांविरोधात गुन्हा

Case Register Against BJP Leader In Malvan: मालवणमध्ये पुन्हा भाजप पदाधिकाऱ्यांकडे पैसे सापडले. नाकाबंदीदरम्यान कारमध्ये दीड लाखांची रक्कम आढळून आली. या प्रकरणी ३ भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Malvan: मालवणमध्ये मध्यरात्री राडा, कारमध्ये आढळले दीड लाख; भाजपच्या ३ नेत्यांविरोधात गुन्हा
Case Register Against BJP Leader In MalvanSaam Tv
Published On

Summary -

  • नाकाबंदीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये दीड लाख रुपये सापडले

  • निलेश राणे मध्यरात्री पोलिस ठाण्यात दाखल होऊन ठोस कारवाईची मागणी

  • डीवायएसपी हस्तक्षेपानंतर तीन भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मालवणमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे पैसे सापडल्याचे समोर आले आहे. देवगड येथील भाजप पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोख रक्कम आढळून आली. मालवण नगरपालिकेचा प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा नाकाबंदी वेळी पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याची कार पोलिसांनी ताब्यात घेतली. याची माहिती मिळताच शिवसेना आमदार निलेश राणे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हालणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर भाजपच्या ३ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक विभागाचे पथक आणि पोलिसांनी मालवण पिंपळपार येथे नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान एका कारमध्ये सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम आणि काही पाकिटे आढळून आली. पुढील तपासासाठी ही कार मालवण पोलिस ठाण्यात आणण्यात आली होती. देवगड येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची ही कार असून ते त्यावेळी कारमध्ये उपस्थित होते. त्यांची चौकशी करण्यात आली. यादरम्यान मालवण येथील दोन भाजपा पदाधिकारी त्याठिकाणी उपस्थित झाले.पोलिसांशी चर्चा करून कार सोडून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Malvan: मालवणमध्ये मध्यरात्री राडा, कारमध्ये आढळले दीड लाख; भाजपच्या ३ नेत्यांविरोधात गुन्हा
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३५ आमदार फुटणार; संजय राऊतांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

याचवेळी त्याठिकाणी उपस्थित झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती आमदार निलेश राणे यांना दिली. आमदार निलेश राणे स्वतः कार घेऊन रात्री १२ वाजता मालवण पोलिस ठाण्यात पोहोचले. निलेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणी ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. निलेश राणे यांनी त्या ठिकाणी ठाण मांडले. तर ज्या कारमध्ये पैसे सापडले त्या कारमधील भाजपा पदाधिकारी आणि मालवण येथील भाजपा पदाधिकारी यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात थांबवून ठेवले होते.

Malvan: मालवणमध्ये मध्यरात्री राडा, कारमध्ये आढळले दीड लाख; भाजपच्या ३ नेत्यांविरोधात गुन्हा
Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

दोन तासानंतर डिवायएसपी पोलिस ठाण्यात आले. कारवाई होणार असे त्यांनी सांगितले. मात्र तात्काळ कारवाई झाली पाहिजे या भूमिकेवर आमदार निलेश राणे ठाम होते. महेश नारकर देवगड भाजपा तालुकाध्यक्ष, बाबा परब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, अजिंक्य पाताडे आणि एक असे हे चार जण भाजपा पदाधिकारी असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. त्यानंतर काही तासांत प्रकरणी पोलिसांनी मालवणमधील भाजपच्या ३ पदाधिकाऱ्यांवर १७१ आणि ५० या कलमांतर्गत मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Malvan: मालवणमध्ये मध्यरात्री राडा, कारमध्ये आढळले दीड लाख; भाजपच्या ३ नेत्यांविरोधात गुन्हा
Maharashtra Politics: काय डोंगर, काय झाडी, आता शहाजीबापूंवर धाडी,भाजपनं आवळला शिंदेसेनेभोवतीचा फास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com