
सांगलीत अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक
“सोन्याचा चमचा” वक्तव्यावरून दोन्ही नेत्यांत टोलेबाजी
एन. डी. पाटील विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात वाद उफाळला
महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले
महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. सरकारमधील नेते एकमेकांवरच टीका-टिप्पणी करण्यात गुंतले आहेत. सांगलीत महायुतीचे दोन्ही दादांमध्ये जुंगलबंदी झाली. सोन्याच्या चमचावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एन.डी. पाटील विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टोला मारला.
एन. डी पाटील विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात आपण गिरणी कामगार असल्याचं म्हटलं. आपण सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवारांना चिमटा काढला. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांना टोला मारला.
'आम्ही पण कष्ट केलं आहे, काही वरून पडलो नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना लगावला. दरम्यान काही दिवसापूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोमणा मारला.
कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत अजित पवार यांनी रोहित पवार यांना फटकारलं. तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाहीये, असा खणखणीत टोला अजित पवार यांनी लगावला. आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी टीका करणाऱ्यांचा सडकून समाचार घेतला.
“आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाहीये. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. राज्यात काहींना असं वाटायला लागलं आहे की, आपण फारच मोठे नेते झालो आहोत. महाराष्ट्राचा सगळा मक्ता त्यांनाच दिला असं ते वागत आहेत. ठीक आहे बोलण्याचा ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. पण त्यांनी अगोदर त्यांचा पक्ष सांभाळावा, इतर पक्षात नाकं खुपसण्याचे काम करू नये,” असा टोला आमदार रोहित पवार यांना अजित पवार यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.