Maharashtra Politics : सुरज चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही! अजित पवारांचा पक्ष हायजॅक?

Maharashtra Political News : अजित पवारांचा पक्ष हायजॅक झाल्याचा आरोप करण्यात आलाय.. मात्र हा आरोप कुणी केलाय? आणि अजित पवारांचा पक्ष हायजॅक झाल्याचा दावा का करण्यात येतोय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
ajit pawar
ajit pawarx
Published On

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चक्कं अजित पवारांचा पक्षच हायजॅक केल्याचं वक्तव्य केलंय.. आणि त्याला कारण ठरलंय मारहाण प्रकरणानंतर सुरज चव्हाण यांचं झालेलं प्रमोशन....

छावा संघटनेच्या विजय घाडगेंना मारहाण केल्यानंतर अजित पवारांनी सुरज चव्हाणांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. मात्र अवघ्या महिन्याच्या आतच सुरज चव्हाण यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आलंय.. मात्र या नियुक्तीबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा असलेले अजित पवारच अनभिज्ञ आहेत... हाच धागा पकडून अजित पवारांच्या पक्षाच्या कोकणातील एका नेत्याने पक्ष हायजॅक केल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय...तर रोहित पवारांचं वक्तव्य बालिश असल्याचा पलटवार तटकरेंनी केलाय...

ajit pawar
Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

शब्दाचा पक्का अशी अजित पवारांची प्रतिमा आहे.. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भाजप प्रो गट अॅक्टिव्ह झाल्याची चर्चा रंगलीय... त्याची कारणं काय आहेत? पाहूयात....

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली.. मात्र अजित पवारांचा विरोध असतानाही भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं.. तसंच माणिकराव कोकाटे वादात सापडल्यानंतरही भुजबळांना शह देणयासाठी कोकाटेंना वाचवल्याची चर्चा रंगलीय..त्यानंतर आता सुरज चव्हाणांना बढती दिल्याने अजित पवारांच्या डॅशिंग प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

ajit pawar
Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

पक्षातील निर्णयच अजित पवारांना माहिती नसल्याने पक्ष नेमकं कोण चालवतंय? अजित पवारांविरोधात त्यांच्याच पक्षातील गट अॅक्टिव्ह झालाय का? असे अनेक प्रश्न आता विरोधकांनी उपस्थित केलेत.. त्यामुळे अशाच घटना घडत राहिल्या तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत अजित पवारांच्या पक्षाला फटका बसण्याची शक्यताच अधिक आहे..

ajit pawar
Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com