Maharashtra Politics : फडणवीसांचा शिंदें गटाला दणका? सरनाईकांच्या खात्यावर फडणवीसांचा वचक? पाहा स्पेशल रिपोर्ट

ST Corporation : महायुती सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चाय. त्यातच आता शिंदे गटाकडे असलेल्या एसटी महामंडळावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करुन शिंदे गटाला शह दिलाय. मात्र या नियुक्तीमागचं राजकारण काय आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Saam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra Politics : सरकार स्थापन झाल्यानंतरही महायुतीत शह-काटशहाचं राजकारण सुरु असल्याचं दिसतंय. एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्रालय शिंदे गटाकडे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी ओळख असलेल्या संजय सेठींची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलीय. यामुळे फडणवीसांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या खात्यावर आपला वचक कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. संजय सेठींची नियुक्ती करण्यामागची कारणं काय आहेत? पाहूयात.

फडणवीसांचा शिंदें गटाला दणका?

- 1310 बस भाडेतत्वावर घेण्याच्या निविदेत 2 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

- एसटी महामंडळाच्या मालकीचे भूखंड खासगी विकासकांमार्फत विकसित करण्याच्या हालचाली

- कर्नाटक सरकारच्या धर्तीवर एसटीचं काही प्रमाणात खासगीकरणाचे संकेत

- स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून शिंदे गटाच्या खात्यावर वचक ठेवण्याची खेळी

महायुतीची सत्ता आल्यानंतर आधी मुख्यमंत्रिपदासाठी, त्यानंतर गृहमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या.. तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली. तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर दिल्लीवरुन स्थगिती आणली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी परिवहन खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आधी बस खरेदीचं टेंडर रद्द केलं तर त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन खात्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठींची नियुक्ती करण्यात आलीय.

Maharashtra Politics
Beed Politics : बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ! फडणवीस बाहुबली, तर पंकजा शिवगामी, बीडचा कटप्पा कोण?

आधीच भाजपने शिंदे गट आणि अजित पवारांच्या मंत्र्यांकडे असलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमले आहेत. तर आता शिंदे गटाच्या खात्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मर्जीतले अधिकारी नियुक्त करायला सुरुवात केलीय. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चेला पुन्हा धार आलीय.

Maharashtra Politics
Dhananjay Munde : 'कराड ते करुणा', कराडनंतर करूणा प्रकरणात मुंडेंची अडचण; राजीनाम्यासाठी पुन्हा दबाव वाढणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com