Nilesh Rane: मोठी बातमी! आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा, कोकणात राजकारण तापलं

Case Register Against Nilesh Rane: शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भाजप नेत्याच्या घरात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
Nilesh Rane: मोठी बातमी! आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा, कोकणात राजकारण तापलं
Nilesh RaneSaam TV
Published On

Summary -

  • आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

  • मालवण पोलिसांनी केला गुन्हा दाखल

  • भाजप नेत्याच्या घरात घुसून छापा टाकल्याचा आरोप

  • छाप्यात २५ लाख रुपये रोख सापडल्याने खळबळ

आमदार निलेश राणेंसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. निलेश राणे यांनी भाजप नेत्याच्या घरात धाड टाकला होता यावेळी २५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली होती.

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर निलेश राणे यांनी छापा टाकला होता. या छाप्यामध्ये २५ लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यामुळे सिंधुदुर्गमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. निलेश राणे यांनी भाजप नेत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमधील वाद शिगेला गेला. निलेश राणेंच्या आरोपांनंतर नितेश राणे हे देखील आक्रमक झाले होते. कोकणात दोन्ही राणे बंधू आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

Nilesh Rane: मोठी बातमी! आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा, कोकणात राजकारण तापलं
Politics : आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

निलेश राणे यांनी गुरुवारी सोशल मीडियावरून लाईव्ह करत मालवणमधील भाजप नेते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली होती. यावेळी त्यांना घरात २५ लाखांची रोख रक्कम असलेली पैशांची बॅग आढळून आली होती. त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत पोलखोल केल्यामुळे सिंधुदुर्गात एकच खळबळ उडाली आहे.

Nilesh Rane: मोठी बातमी! आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा, कोकणात राजकारण तापलं
Maharashtra Politics: नगराध्यक्ष पदावरून वाद, ठाकरे सेनेत पुन्हा नाराजीनाट्य; कोकणातील बड्या नेत्याची सभेला दांडी|VIDEO

विजय केनवडेकर हे भाजपाचे स्थानिक नेते आहेत. त्यांच्या घरी गुरूवारी निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह गेले. निलेश राणे अचानक आल्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत या भाजपा कार्यकर्त्यांची एकच धावपळ झाली. त्याना काय करावे हेच कळत नव्हते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, 'मी कुणाच्या बेडरूममध्ये जाणार नाही. पण जे काय आत आहे ते बाहेर आणा.' त्यानंतर कार्यकर्ते निलेश राणेंना बेडरूममध्ये घेवून गेले. त्यावेळी तिथे पैशांनी भरलेली बॅग आढळून आली होती. आता या प्रकरणीच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदेशीरपणे कार्यकर्त्यांसह भाजप नेत्याच्या घरी घुसल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

Nilesh Rane: मोठी बातमी! आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा, कोकणात राजकारण तापलं
Maharashtra Politics: नाना पटोलेंना महागात पडणार, 'त्या' टीकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com