Eknath Shinde: कमी बोलू आणि जास्त काम करू, तेवढं चांगलं; एकनाथ शिंदेंकडून आमदारांना कानपिचक्या

Eknath Shinde: शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आलेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कानपिचक्या दिल्या आहेत.
Eknath Shinde Slams  MLA
Eknath Shinde Slams MLA
Published On

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांना कानपिचक्या दिल्या आहेत. कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढं चांगलं. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका, अशा सुचना एकनाथ शिंदेंनी आमदारांना कानपिचक्या देताना दिल्यात.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आलेत. खासदार श्रीकांत शिंदेंच्या अभिनंदनाचा ठराव, जातीय जनगणना निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव, मराठी अस्मिता, भारताची बाजू विदेशात भक्कमपने मांडणे, पक्षांतर्गत निवडणुकांचा ठराव, निवडणूक जाहीर करण्याचा ठराव, पक्ष गटाच्या पदाचे पदनाम बदलण्याचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला.

Eknath Shinde Slams  MLA
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

तसेच पक्षाचे पुढचे अधिवेशन दिल्लीत घेण्यात यावे असा ठरावही यात मांडण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी कार्यकारिणीला मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना कानपिचक्याही दिल्या. कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढं चांगलं. तसेच विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका. आपण एवढे मोठे यश मिळवले ते चुकीचं बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल असं काही करू नका . केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे. जास्त ऐका कमी बोला, अशा कानपिचक्या एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.

Eknath Shinde Slams  MLA
Sanjay Raut: संजय राऊत यांची 'ती' स्क्रिप्ट ईडीच्या हाती...

मराठी माणूस आपल्यासोबत- एकनाथ शिंदे

मराठीची गळचेपी सहन करणार नाही. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचं ते आपण करणार. दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे. मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणायचा प्रयत्न आपण करत आहोत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या कार्यकाळात झालाय, असं शिंदे यांनी बैठकीत आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com