Sanjay Nirupam Resign: ब्रेकिंग! संजय निरुपम यांनी दिला काँग्रेस पक्षाचा राजीनामा

Sanjay Nirupam resigned from the Congress party: पक्षाकडून काल हकालपट्टी केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Sanjay Nirupam
Sanjay NirupamSaam Tv

Sanjay Nirupam Resign:

एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाकडून काल हकालपट्टी केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढे संजय निरुपम काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम आणि काँग्रेसमधील वाद समोर आला होता. त्यानंतर संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती करण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतला होता.

अशातच काल राज्यातील पक्षाच्या कार्यकारिणीने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी शिफारस केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते के.सी वेणुगोपाल राव यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचे पत्रातून सांगितले होते. या हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे

Sanjay Nirupam
Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा; तापमानाचा पारा ४२ अंशांपार

"काल रात्री पक्षाला माझा राजीनामा पत्र मिळाल्यानंतर त्यांनी माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला, असे दिसते. अशी तत्परता पाहून बरे वाटले. फक्त ही माहिती शेअर करत आहे. मी आज दुपारी 11.30 ते 12 या वेळेत तपशीलवार निवेदन देईन," असे संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाली होती. अशातच आता लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Sanjay Nirupam
Parbhani News: परभणीत माकडांच्या टोळीचा हैदोस... हल्ल्यामध्ये १०- १५ जण जखमी; गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com