Mumbai: 'राज्यभरात शिवजयंती...' पालिका निवडणुकांआधीच भाजपचा मेगाप्लान

राज्यात गेल्या काही काळात सरकार विरोधात तयार झालेला नकारात्मक सूर दूर करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे
Devendra Fadnavis Chandrakant  Patil
Devendra Fadnavis Chandrakant PatilSaam TV
Published On: 

Mumbai BMC Election : मुंबई महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी आधी भाजपने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इतकेच नव्हेतर राज्यात गेल्या काही काळात सरकार विरोधात तयार झालेला नकारात्मक सूर दूर करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे.

त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दणक्यात साजरी करण्याचे आदेश भाजपने दिले आहेत. यानिमित्ताने भाजपकडून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला जाणार आहे. (Mumbai BMC Election)

Devendra Fadnavis Chandrakant  Patil
Maharashtra Congress: पटोले- थोरात वादानंतर कॉंग्रेस हायकमांड ऍक्शन मोडवर, बडा नेता घेणार थोरातांची भेट

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी मुंबई महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून भाजपने कंबर कसली आहे. यासाठी भाजपाने यंदा शिवजयंती दिवशी राज्यभरात व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व रक्तदाब शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शिवजयंतीच्या मुहूर्तावर महारक्तदान शिबीराची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

Devendra Fadnavis Chandrakant  Patil
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; तब्बल १०-१५ आमदारांचा होणार शिंदे गटात प्रवेश?

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी करणार आहे. तसेच १९ फेब्रुवारीला ५००हून अधिक ठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये १५९ नर्सिंग महाविद्यालय, ९० आयुर्वेदिक महाविद्यालय, ७० होमिओपॅथी महाविद्यालयांचा समावेश आहे. याबद्दलचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालय व विद्यापीठांना दिले आहेत.

त्यामुळे मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने (BJP) कंबर कसल्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com