भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाजपला मोठा धक्का बसला. लातूरमधूल भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुवकीपूर्वी हा भाजपाला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे
भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
CM Devendra FadnavisSaam Tv
Published On

Summary -

  • भाजप नेते हेमंत जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकला.

  • सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे नाराजी व्यक्त केली.

  • मुख्यमंत्री फडणवीस लातूर दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षाची साथ सोडली.

  • स्थानिक निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. अनेक नेते, पदाधिकारी पक्षाची साथ सोडत आहेत. भाजपने या निवडणुकीपूर्वी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक पक्षाची नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशामध्ये आता भाजपलाच मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असतानाच एका बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या नेत्याने नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्यामागचं कारण सांगितले आहे.

भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
Maharashtra Politics : नकली नोटा, पथनाट्य, पत्ते खेळ आणि होम-हवन ; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात राज्यभर जनआक्रोश आंदोलन

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे शक्तीबुथ केंद्र प्रमुख आणि उपाध्यक्ष हेमंत जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. हेमंत जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओद्वारे त्यांनी पक्षाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगत पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कुठलेही काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
Maharashtra Politics : आदिवासींवर पोलिसांचा लाठीचार्ज? रोहित पवारांचे आरोप! शिंदेंचं नाव घेत आमदाराचं स्पष्टीकरण

हेमंत जाधव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, 'मी सर्वांना सांगू इच्छितो की मी इथून पुढे भारतीय जनता पार्टीचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही. याची कारणं बरीच आहेत आणि याचा मी बऱ्याचदा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये मला कधीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वैयक्तिक कारणासाठी अजिबात नाही. ज्या कारणासाठी मी भाजपसोबत काम करत होतो. पार्टी त्यापैकी कुठलंही काम करायला तयार नाही. त्यामुळेच मी या पदाचा राजीनामा देत भाजपसोबत काम करायचे नाही हे जाहीर करत आहे.'

भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
Maharashtra Politics : CM देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवताहेत; मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते लातूर विमानतळावर दाखल झाले. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हसते लातूर जिल्हा परिषद प्रांगणातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्याचसोबत ते आज लातूर जिल्हा विकास कामांसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ही बैठक होणार आहे.

भाजपला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी
Maharashtra Politics: भाजपचा काँग्रेसला जोरदार झटका, बड्या नेत्याने सोडली साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com