Maharashtra Politics: ...तर बोगस मतदारांचा आकडा १५ हजारांपर्यंत जाईल, बाळासाहेब थोरातांचा नव्या दाव्याने खळबळ

Balasaheb Thorat And Radhakrishna Vikhe Patil: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बोगस मतदारांबाबत आणखी एक मोठा दावा केला आहे. संगमनेर शहरातील आकडा जोडला तर बोगस मतदारांची संख्या १५ हजारांपर्यंत जाऊ शकते असा आरोप त्यांनी केला आहे.
Maharashtra Politics: ...तर बोगस मतदारांचा आकडा १५ हजारांपर्यंत जाईल, बाळासाहेब थोरातांचा नव्या दाव्याने खळबळ
Balasaheb Thorat And Radhakrishna Vikhe PatilSaam Tv
Published On

Summary -

  • संगमनेरमध्ये १५ हजार बोगस मतदार असल्याचा बाळासाहेब थोरात यांचा दावा

  • भाजपवर मतदार याद्यांमध्ये फेरफार करून घोटाळा केल्याचा आरोप

  • निवडणूक आयोग डिजिटल युगात दुरुस्ती करत नसल्याबद्दल थोरात यांची टीका

  • भाजपने मतदार याद्यांतील घोळ घालण्याची पद्धत आणली असल्याचा आरोप थोरातांनी केलाय

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

संगमनेर मतदारसंघाच्या ग्रामीण भागात साडेनऊ हजार नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर विखे पाटलांनी थोरात यांच्यावर टीका करत या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे म्हटले होते. बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा मतदार यादीतील घोळाबाबत नवा दावा करत संगमनेर शहरातील आकडा जोडला तर बोगस मतदारांची संख्या १५ हजारांपर्यंत जाऊ शकते असा आरोप केलाय.

Maharashtra Politics: ...तर बोगस मतदारांचा आकडा १५ हजारांपर्यंत जाईल, बाळासाहेब थोरातांचा नव्या दाव्याने खळबळ
Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

निवडणुकीत घोटाळे घालण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाने आणली असून मतदार याद्यांमधील घोळ हा त्यातलाच एक फंडा असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब थोरात यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'संगमनेरच्या ग्रामीण भागात साडेनऊ हजार नावांमध्ये घोळ आहे. काही मयत, काही दुबार तर काही ओळखू येत नाही कुठून आलेत इतका घोळ आहे. शहरातला आकडा काढला तर पंधरा हजारापर्यंत जाईल. हरकती घेतल्या मात्र तहसीलदार म्हणतात दुरुस्तीचे अधिकार आम्हाला नाहीत. मग हरकती का मागवता? निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय? डिजिटल युगात या चुका सहज दुरुस्त होऊ शकतात. मात्र हे का केलं जात नाही? त्यामुळे राज्य आणि देशपातळीवर शंका घ्यायला जागा.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'विधानसभा निवडणुकीबाबत आम्ही जास्त विचार करत नाही, तर पुढचा विचार करतो. निवडणुका लोकशाहीचा पाया, ते निकोप असले पाहिजे. निवडणुकीत घोटाळे घालण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाने आणली आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ हा त्यातलाच एक फंडा आहे. विधानसभेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ होता. आजही तोच घोळ कायम ठेऊन कार्यक्रम चाललेला आहे.' तसंच, विखे पाटील यांनी थोरातांना चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका केली होती. त्यावर ते म्हणाले की, 'ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी जे बोलतोय त्याची सत्यता त्यांनी तपासली पाहिजे. फक्त उत्तर देण्यासाठी काहीतरी प्रतिक्रिया देणं योग्य नाही.'

Maharashtra Politics: ...तर बोगस मतदारांचा आकडा १५ हजारांपर्यंत जाईल, बाळासाहेब थोरातांचा नव्या दाव्याने खळबळ
Maharashtra Politics : सत्ताधारी आमदारांना विकासनिधी की खैरात; निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी, वाचा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com