

Maharashtra Political News: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. मात्र या सर्वांमध्ये तिन्ही पक्षांत जागा वाटपावरुन गोंधळ अस्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जागा वाटपाचा फ्लॉम्यूसाठी मविआचं ठरलेलं सूत्र आता जाहीर केलं आहे. (Latest Marathi News)
जो जिंकेल त्याची जागा
"आमच्या कार्यकर्त्यांची यासाठी मानसीकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की, जागा वाटपावरुन कुठलेही मतभेद करायचे नाहीत. आपल्याला एकत्र यायचं आहे. निवडणूक लढवायी आणि जिंकायचं आहे. जे जिंकेल त्याची जागा हे सूत्र आमचं ठरलेलं आहे. जागेचा हट्ट धरायचा नाही. जागा जिंकायची आणि मिळवायची असं आमचं ठरल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.
"महाराष्ट्रात महाविकास आघाडी अत्यांत मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. तिन्ही पक्षांची आघाडी विधानसभा किंवा लोकसभा या दोन्हींमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहेत. तीन पक्ष एकत्र असल्यावर जागावाटपांमध्ये अनेकांना तडजोड करावी लागेल. मागे पुढे काही गोष्टी कराव्या लागतील. हे सर्व करण्यासाठी आमची तयारी आहे.", असंही राऊतांनी यावेळी सांगितलं.
भीतीपोटी सरकार राज्यात कोणत्याच निवडणुका घेणार नाही
शिंदे फडणवीस सरकारने परिपत्रक काढून मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यावरुन देखील राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. भीतीपोटी राज्य सरकार निवडणुका घेणार नाही. महापालिका निवडणुकही भीतीपोटी घेतली जात नाही. मुंबई विद्यापीठात युवासेनेचा 100 टक्के पॅनल निवडून येणार आहे. आपला पराभव होणार या भीतीपोटी सरकार राज्यात कोणत्याच निवडणुका घेणार नाही. निवडणुका न घेणं म्हणजे सरकार डरपोक, भयग्रस्त असल्याचं उदाहरण आहे.", अशा शब्दांत सिनेट निवडणूक रद्द करण्यावरुन राऊतांनी हल्लाबोल केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.