Sanjay Raut News: 'तुमची फोटोबाजी तुमच्याकडे ठेवा...'; मराठा आरक्षणाच्या जाहिरातीवरून संजय राऊत शिंदे सरकारवर बरसले

Sanjay Raut News: जाहिरातीवरून शिवसेना खसदार संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV
Published On: 

Maharashtra Political News:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. अशात आज सर्व वृत्तपत्रांवर मराठा आरक्षणावरील सरकारची जाहिरात झळकली. या जाहिरातीवरून शिवसेना खसदार संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. या जाहिरीती कोणीही पाहत नाही. तुमची फोटोबाजी तुमच्याकडे ठेवा, असा टोला संजय राऊतांनी सरकारला लगावलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut News
Pune Crime News : पुण्यातील कोयता गँगच्या म्हाेरक्यासह मित्र ठार, पाेलीस तपास सुरु

सरकारला आरक्षण द्यायचंय की नाही? याबाबत स्वत:ला मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समोर येऊन सांगायला हवं. आज आरक्षणासाठी तिसरी आत्महत्या झालीये. मनोज जरांगेंनी दिलेल्या कालावधीत ३ जणांनी आत्महत्या केल्या. मात्र सरकराच्या डोळ्यांची पापणीही हालली नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केलीये.

दिवाळी आधी वातावरण बिघडू शकतं

सरकार जाहिरीतींवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. तुमच्या जाहिराती कोणीही वाचत नाही. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आपली जाहिरातबाजी आपल्याकडेच ठेवावी. सरकारमधील काही व्यक्ती वेगळ्याच दिशेने भूमिका घेतायत. त्यामुळे दिवाळी आधी वातावरण बिघडू शकतं, असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिलाय.

मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी फेल्युअर ठरलेत. अजित पवार तर आरक्षणावरून प्रश्न विचारल्यावर पळ काढतायत, आणि लोकं आत्महत्या करतायत. सरकार आणखी किती लोकांचा जीव घेणार?, असं संजय राऊत म्हणालेत.

काय आहे जाहिरातीत?

जाहिरातीत मराठा समाजाला 'धोरण आखले आहे तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षण पूर्ण करण्याचे, पुन:श्च...मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयाच्या प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास शासन बांधिल आहे. असे लिहिले आहे, अशी जाहिरात आज सर्व वृत्तपत्रांमध्ये झळकलीये.

Sanjay Raut News
Nashik Crime: लासलगावच्या डॉक्टरची लुटमार; पोलिसांनी आवळल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांच्या मुसक्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.