Rohit Pawar News: ते एसीमध्ये बसून मजा बघतायत आणि आम्ही आमच्यात भांडतोय...; रोहित पवारांचा रोख कुणावर?

NCP Crisis: या सर्वांमध्ये दोन्ही गटांकडून सभा आणि पत्रकार परिषद घेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसतातयत.
rohit pawar
rohit pawar saam tv
Published On: 

Maharashtra Political News: राष्ट्रवादीत सध्या उभी फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झालेत. या सर्वांमध्ये दोन्ही गटांकडून सभा आणि पत्रकार परिषद घेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसतायत. भाजपसह अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं जातय. या सर्व परिस्थितीवरुन रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधत एक खंत व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

बंडात सहभागी झालेली चार-पाच मंडळी स्वतःला बाजूला करून अजित पवारांना विलन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलाय. काल नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी सहज अजित पवारांना बाजूला काढलं. पक्ष फुटल्याचं खापर त्यांनी अजितदादांवर फोडलं. दुसरीकडे नाशिकमध्ये पोस्टरवर अजित पवारांचा फोटो सुद्धा नव्हता, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

rohit pawar
Political News : चंद्रशेखर बावनकुळेंवर बोलताना तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे कपडे फाडू, प्रसाद लाड यांचा अरविंद सावंतांना इशारा

पुढे त्यांनी भुजबळांवर निशाणा साधत म्हटलं की, अजित पवारांना चार-पाच लोक व्हिलन करत आहेत. दादा मोठे नेते आहेत तो निर्णय कोणालाच पटला नाही. ते (भाजप) एसीमध्ये बसून मजा बघतायत आणि आम्ही आमच्यात भांडतोय. मात्र जनतेला माहिती आहे. कुटुंब आणि पक्ष कोणी फोडलाय. ही गोष्टी लोकं विसरणार नाहीत असंही आमदार रोहित पवारांनी यावेळी म्हटलं.

तसेच भाजपवर (BJP) निशाणा साधत रोहित पवारांनी म्हटलं की, भाजपने एक डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्यासाठी पक्ष काढला तो भाजपने फोडला. भाजपच्या विरोधात देशात वातावरण तापलं आहे, त्यावर कोणी बोलू नये अनेक मोठे नेते आपल्यातच गुंतून रहावेत यासाठी भाजपने आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला आहे. उत्तर-प्रत्त्युतर आपण आपल्यातचं देत आहोत आणि भाजप वेगळं राहतंय, अशी खंत व्यक्त करत रोहित पवारांनी भाजपवर टीका केली केली आहे.

rohit pawar
Rohit Pawar Full PC : कोण कशासाठी गेले आहे याचा अंदाज आम्हाला आलाय - पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.