Maharashtra Political News : उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार; नागपुरातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Political News : काँग्रेसचे निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख यांनी हा दावा केला आहे.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSaam TV
Published On

Ashish Deshmukh News: राज्यातील संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊच देणार नाहीत. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येणार आणि महाविकास आघाडी तुटेल, असा दावा काँग्रेसचे निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालांनतर अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अपात्रतेची ही कारवाई सहा वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे अनेकजण राजकारणातून बादही होतील, असं देशमुख यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Bacchu Kadu News: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी, मंत्रिपदाचा दर्जा जाहीर

कोणताही राजकीय नेता किंवा पक्ष आपल्या आमदारांना अपात्र होताना पाहणार नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना आगामी काळात एकत्र येतील. अपात्रेविषयीचे ताांत्रित मुद्दे पाहिले असता कुणालाही राजकारणातून बाद व्हायला आवडणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत एकमेव मार्ग उरला असेल तो म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र येणे, असंही त्यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? भाजप आमदारांमुळे उशीर होत असल्याची चर्चा

त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही नेते एकत्र आले तर कुणीही अपात्र होणार नाही. दोन्ही नेत्यांकडे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याच्या महाविकास आघाडीच्या वाटाघाटीला काहीही अर्थ नाही. दोन्ही नेते एकत्र येतील आणि ती शिवसेना भाजजसोबत जाईल, असा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com