Ajit Pawar Upset: महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Political News: उपमुख्यमंत्री अजित पवार गणेश दर्शनासाठी वर्षावर आले नाहीत.
Ajit Pawar On Jalna Maratha Andolan
Ajit Pawar On Jalna Maratha Andolansaam tv
Published On

रुपाली बडवे

Maharashtra Political:

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कलाकारांपासून ते सर्वच राजकीय नेत्यांनी वर्षावर गणरायाचे दर्शन घेतले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार गणेश दर्शनासाठी वर्षावर आले नाहीत त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. (Latest Marathi News)

Ajit Pawar On Jalna Maratha Andolan
Maharashtra Politics: भाजप-शिवसेनेतील वाद अखेर मिटला; कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदेंच लढणार?

राष्ट्रवादीतून अजित पवारांनी वेगळे होत भाजपसह सत्तेत सहभाग घेतला. अशात आता तयार झालेल्या महायुतीवर अजित पवार नाराज असल्याचं म्हटलं जातंय. अजित पवारांनी गणपती दर्शनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी हजेरी लावली होती. तसेच बाप्पाचे दर्शन घेतले होते.

उपमुख्यमंत्री सागर बंगल्यावर गेले त्यावेळी तेथे देवेंद्र फडणवीसांशी त्यांची बराच वेळ चर्चा सुरू होती. याच दिवशी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचेही दर्शन घेणार होते. मात्र चर्चा बरीच वाढल्याने वर्षावर जाणे आयत्यावेळी रद्द करावे लागले.

गणेशोत्सवानिमित्त राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी वर्षावर हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं. मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार देखील वर्षावर आले होते. सोशल मीडियावर शाहरुख आणि सलमान खान यांचे वर्षावरील फोटो तुफान व्हायरल होत आहेत. वर्षावर मराठी सिनेविश्वातील देखील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कलाकार आले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार न आल्याने त्यांनी वर्षाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar On Jalna Maratha Andolan
Beed Crime News : बलात्कारातील आरोपीची विष पाजून हत्या; ५ जणांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com