Marathi News Live Updates: अंबरनाथ -बदलापूर स्थानकांदरम्यान रेल्वे इंजिनात बिघाड, रेल्वेसेवा विस्कळीत

Maharashtra Political Breaking News 13 July 2024 : विधानपरिषद निवडणूक निकाल आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV

Mumbai Local : अंबरनाथ -बदलापूर स्थानकांदरम्यान रेल्वे इंजिनात बिघाड, रेल्वेसेवा विस्कळीत

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाली आहे. त्यामुळे अंबरनाथवरून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा अर्ध्या तासापासून विस्कळीत झाली आहे. अतिरिक्त इंजिन मागवून मालगाडी पुढे नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Pm modi mumbai visit : महाराष्ट्रातील संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचंय : PM नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात मोठी संत परंपरा आहे. महाराष्ट्रातील संतांनी दाखवलेल्या मार्गाने आपल्याला चालायचे आहे. याच भावनेतून विकास कार्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद देतो

PM Narendra Modi Mumbai Visit : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार : PM नरेंद्र मोदी

महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षी १० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.या प्रशिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण ही आपली गरज आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत कोरोना सारख्या संकटानंतर भारतात रेकॉर्ड ब्रेक रोजगार निर्मिती झाली आहे, यापुढेही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार आहे.

PM Narendra Modi Live : PM नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, २९००० कोटींच्या विकासकामांचं करणार उद्घाटन 

पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मुंबईत आले आहेत. त्यांनी १० वर्षांत विकास पर्वाने देश घडवला आहे. पंतप्रधान झाल्यावर त्यांचा हा पहिलाच मुंबईचा हा पहिलाच दौरा आहे. २९ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Kolhapur News  : कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू

किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारल्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती उद्या विशाळगडवरील अतिक्रमण काढण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 6 ते दिनांक 29 जुलै रोजी रात्री 24 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil : आजचा दिवस वाट पाहणार, मराठ्यांचा रोष सरकारला परवडणार नाही; मनोज जरांगें

मराठा आरक्षणासाठी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी १३ जूनचा अल्टीमेटम् दिला होता. आज त्यांच्या अल्टीमेटमचा शेवटा दिवस आहे. जरांगेंनी आजचा दिवस वाट पाहणार आहे, जर योग्य निर्णय घेतला नाही तर सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही, असा इशारा दिला आहे.

Sambhaji Raje : मुख्यमंत्र्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवलं, मग विशाळगडावरील का नाही; संभाजीराजे

मुख्यमंत्र्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवलं, मला त्यांच्यावर विश्वास आहे,. पण ते विशाळगावर का बोलत नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे मला पण वाटते, पण सरकारला वाटत नाही, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Pune News: पिंपळे सौदागर परिसरात 14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रोज लँड सोसायटीच्या एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी घेत एका 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे

Raigad Baking: रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट केला बंद

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट मार्गावर मोठमोठ्या दगडी टाकून बंद केलाय. रायगड आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी घाट बंदची अधिसुचना काढून देखील प्रवासी आणि मालवाहू गाड्याकडून घाट रस्ताचा वापर सुरु होता.

Bhiwandi Rain: भिवंडी शहरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरूवात

भिवंडी शहरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला .. शहरात पुन्हा पावसाचे पाणी साचायला सुरवात झालीय. शहरातील काल्हेर ते कशेली या भागात रोडवर दीड ते दोन फूट पाणी साचले. पाण्यामध्ये काही गाड्या अडकल्या आहेत.

Pune News:  पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद 

पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. या मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलाय.

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये मागील तासाभरात पावसाचा कहर, बाजारपेठेला तडाखा

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरमध्ये मागील तासाभरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाचा तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसलाय. गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने वाहन चालकांची तारांबळ उडालीय.

Rain Update:  मुसळधार पावसाने मीरा भाईंदरला झोडपले 

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मीरा भाईंदरला चांगलेच झोडपून काढले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

Navneet Rana:  राणा दांपत्याने वारीतील महिला भाविकांशी फुगडी खेळत लुटला वारीचा आनंद  

आषाढी सोहळ्यासाठी आज सर्व पालख्या वेळापुर या ठिकाणी आल्या असता भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी वारीतील महिला भाविकांशी फुगडी खेळून वारीचा आनंद लुटला. त्याचबरोबर हरिनामाचा गजर करत विठू माऊली राम कृष्ण हरी म्हणत वारकरी महिला भाविकांबरोबर माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा या दांपत्यानी यांनी फुगडी खेळली.

Palghar News: आरती ड्रग्स कारखान्यात गॅस लिकेज, पालघरमधील घटना

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी 150 मधील आरती ड्रग्स कारखान्यातून विशिष्ट प्रकारचा गॅस लिकेज झाल्याची माहिती समोर आलीय. गॅस लिकेज झाल्यानंतर कामगारांमध्ये धावपळ झाली होती. कारखान्यातून सर्व कामगार बाहेर पडले. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत.

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; पालघर, बोईसर, डहाणू, चारोटी परिसरात मुसळधार पाऊस सुरू

पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळालीय. तासाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघर, बोईसर ,डहाणू ,चारोटी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. भातशेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जातंय.

Manoj Jarange: छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांच्याकडून मनोज जरागे यांचं स्वागत

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांचं आगमन झालंय. छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांच्याकडून मनोज जरागे यांचे स्वागत करण्यात येतंय.

Rahuri News:  राहुरी विद्यापीठात कुलगुरू विरोधात प्राध्यापकांचे उपोषण

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू विरोधात प्राध्यापकांनीच उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सेवा जेष्ठतेची यादी डावलून आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत विद्यापीठाचे दोन प्राध्यापक गेल्या चार दिवसांपासून राहुरी कृषी विद्यापीठात उपोषण करत आहेत...

Akola News: धबधब्यावर बुडून एका युवकाचा मृत्यू, अकोला तालुक्यातील घटना

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील धोधाणी येथील धबधब्यावर बुडून एका युवकाचा मृत्यू झालाय. बुड़ालेला युवक अकोल्यातील आहे. तासभराच्या अथक प्रयत्नानंतर युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय.

Pankja Munde: पाच वर्षांनंतर मला पुन्हा एकदा राज्यात काम करण्याची संधी मिळाली; पंकजा मुंडे

पाच वर्षांनंतर मला पुन्हा एकदा राज्यात काम करण्याची संधी मिळालीय. पुन्हा एकदा सक्रियपणे काम करेल. दोन समाजांच्या जातीचा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे, तो प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राजकारणामध्ये एकदाच खोटं बोलून मत मिळवता येतात, मात्र पुन्हा एकदा अशा पद्धतीने मतं मिळवता येणार नाहीत. भाजपच्या हितासाठी कोणी येत असेल तर त्यांचं स्वागतच अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिलीय.

Beed News: सरपंचाकडून शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला, बीडमधील घटना

शेतीच्या वादातून सरपंचाने शेतकऱ्यावर चक्क तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर आला. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी गावात सरपंच कुटुंब आणि शेतकऱ्यात शेतीचा वाद होता. याप्रकरणी पीडित शेतकऱ्याने पोलिसात तक्रार देखील दिली होती. याचाच राग मनात धरून सरपंच संदीप अस्वर यांच्यासह कुटुंबाने चक्क तलवारीने शेतकऱ्यावर हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.

Palghar Accident: पालघरमध्ये लक्झरी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांच्या चालकांसह काही प्रवासी जखमी

विक्रमगड वसूरी जवळ पुन्हा एकदा लक्झरी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह काही प्रवासी जखमी झालेत. जखमींना विक्रमगड आणि वाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

Nagpur Accident: उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, नागपुरमधील घटना

नागपुरात पुन्हा एकदा उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारडी उड्डाण पुलावर आज दुपारी ही घटना घडली. सुमारे 50 फूट उंचावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय.

Manoj Jarange Patil Rally: मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरूवात; मराठा बांधव एकवटले

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकात आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात होणार रॅलीला सुरुवात होणार असून केंब्रिज चौकात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शहरातील विविध ठिकाणी जरांगे पाटील यांच होणार जंगी स्वागत.

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन केस: साईप्रसाद बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

वरळी हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत आरोपी मिहीर शहा यांनी जुहू परिसरातील ग्लोबल वाईस तास बारमध्ये मध्य प्राशन केल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा त्याने मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील काच पाडा परिसरातील साईप्रसाद बार मधून बियरचे चार कॅन खरेदी केले होते तशी कबुली त्याने पोलीस तपासा दरम्यान दिली आहे यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील ॲक्शन मोडवर आला असून काल दिवसभर साईप्रसाद वारची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात आली यानंतर रात्री उशिरा या बारला सील करण्यात आले आहे

IAS Pooja Khedkar: ऑडीवर लाल दिवा लावणे भोवलं; पूजा खेडकर यांच्याशी संबंधित कंपनीला नोटीस

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याशी संबंधित कंपनीला आरटीओची नोटीस दिली आहे. ऑडी कारवर लाल दिवा लावणे आणि महाराष्ट्र शासन लिहिण्याबद्दल आरटीओ खेडकर यांच्याशी संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. थर्मेो व्हेरीटा इजिनिअरींग प्रायवेट लिमीटेड असे नोटीस बजावण्यात आलेल्या कंपनीचे नाव आहे. ⁠याच कंपनीच्या नावानं वादग्रस्त ऑडी कार आरटीओकडे नोंदणीकृत आहे

Anil Ambani Meet Devendra Fadnavis: उद्योगपती अनिल अंबानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला 

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही भेट होत आहे.

Ashadhi Wari 2024: आषाढी यात्रेपूर्वी 8 लाख भाविकांनी घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

आषाढी वारीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अवघ्या सात दिवसात तब्बल 8 लाख भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले आहे. व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे दर्शनाचा वेग वाढला आहे. सातजुलै पासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू झाले आहे.

Jalna News:  शालेय पोषण आहारासाठी आणलेल्या भाजीपाल्यामध्ये आळ्या

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील डोणगाव केंद्रांअतर्गत येणाऱ्या सातेफळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यात अळया आढळून आल्यात. यावेळी गावातील ग्रामस्थांनी हि बाब शाळेच्या मुख्यध्यापकांच्या निदर्शनात आणून देत त्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.

 CM Hement Soren Meet Sonia Gandhi: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोनिया गांधींच्या भेटीला

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीमध्ये सदिच्छा भेट घेतली. हेमंत सोरेन यांच्यासोबत पत्नी कल्पना सोरेन देखील उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटका झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या भेटीला विशेष महत्व आहे.

Maharashtra Politics: विधानपरिषद निवडणूक: महायुतीचे विजयी उमेदवार फडणवीसांच्या भेटीला 

विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे विजयी उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. भाजप आमदार योगेश टिळेकर, आमदार परिणय फुके, सदाभाऊ खोत, शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर हे फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

Solapur Civil Hospital News: संतापजनक ! गर्भवती महिलेला फरशीवर झोपवले; सोलापूर जिल्हा रुग्णालयातील प्रकार

एका गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचराकांनी फरशीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसववेदना होत असल्याने गर्भवती महिलेच्या नातेवाकांनी गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्रसाववेदनेचा त्रास सहन करणाऱ्या गर्भवतीला फरशीवर झोपवल्याने त्यांच्या नागेवाईकांनी जाब विचारला. यावेळी जाब विचारणाऱ्या नातेवाईकांशी परिचारिकेने वाद घालत उद्धटपणे उत्तरे दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

Kolhapur News: 'शिवप्रेमींची दिशाभूल करु नका', सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन

राज्य शासनाच्या वतीने लंडनहून वाघ नख्या आणण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. बिंदू चौकात एकत्र येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या विरोधात निदर्शने केली. खोटी माहिती देऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार शिवप्रेमींची दिशाभूल करत असल्याचाही आरोप करण्यात आला.

Ajit Pawar Meet Amit Shah: अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट 

विधानपरिषदेच्या निकालानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये गेलेत. दिल्लीमध्ये आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

IAS Pooja Khedkar: 'ऑडी कारसह हजर रहा', पुणे पोलिसांचे आदेश 

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कार पोलीस स्टेशनला हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑडी कारसह कारचे कागदपत्रे तपासण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ऑडी कारच्या थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड या कंपनीला पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेची नोटीस दिली आहे.

Ratnagiri News: दुर्दैवी! कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

Ratnagiri News: मुसळधार पावसात चिपळूणमधील DBJ कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडला.

Lonavla Bhushi Dam News: लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी 

गेली आठवडाभर ओढ देणारा पाऊस कालपासून पर्यटननगरी लोणावळ्यात बरसू लागलाय. यामुळं विक एंडच्या मूडला आणखी बहर चढला आहे. या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली आहे. मात्र डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्गाशी आपण खेळायला गेलो तर तो आपल्या जीवाशी खेळतो. याचा धडा हे दोन आठवड्यापूर्वी वाहून गेलेल्या अन्सारी-सय्यद कुटुंबियांच्या घटनेतून पर्यटकांनी घेतलेला आहे. याचं जाणीवेतून पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक खबरदारी घेताना दिसत आहेत.

Shekap Leader Jayant Patil Press: 'पराभवाचे आत्मचिंतन करु', 'शेकाप नेते' जयंत पाटील

"शरद पवार यांची भेट झाली नाही. ते फोन घेत नाहीत. पहिल्यांदा घोडा बाजार झालेला आहे. त्यामुळे आम्ही आत्मचिंतन करू. महाराष्ट्रामध्ये असे राजकारण नव्हते. आमची भूमिका ठाम आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार आहोत. माझ्या पक्षाचं आणि माझं सभागृह हळहळत आहे. शरद पवार यांना धन्यवाद ते माझ्यासाठी उभे राहिले," असे म्हणत जयंत पाटील यांनी पराभवावरुन प्रतिक्रिया दिली.

PM Narendra Modi Mumbai Visit: PM मोदींच्या हस्ते २९ कोटींच्या कामांचे उद्घाटन; विधानसभेचे रणशिंग फुंकणार

आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या वतीने 29 कोटीचे विविध प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.गोरेगाव येथील नेस्को एक्जीबिशन सेंटर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडेल.याच कार्यक्रमातून विधानसभांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुकले जाणार आहे.

Andheri Subway Closed: 'अंधेरी सब वे' वाहतूकीसाठी बंद

मुंबईचा उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सब वे मध्ये देखील पाणी साचले असून वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बॅरिगेट लावून नागरिकांना आणि वाहनांना सब वेतून जाण्यास मनाई केली आहे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून अंधेरी गोखले पूलाचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. अंधेरी सब वेळ जन्म झाल्यामुळे परिसरातील अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरले आहेत

Navi Mumbai Rain: नवी मुंबईत 'जोरदार' पाऊस, पुढील ३ तास महत्वाचे

नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेच्या विश्रांतीनंतर पावसाची शहरात संततधार सुरूअसून दिघा वाशी नेरुळ बेलापूर विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. मागील 24 तासात 50 मिलिमिटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह रायगड जिल्ह्यात पुढील तीन तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरून मनसे आक्रमक; खड्ड्यात भरवली शाळा

मुंबई गोवा महामार्गावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली असून पनवेल येथील पळसपे फाट्याजवळ मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसेचे आंदोलन आहे. मनसेने खड्ड्यांमध्ये बसून शाळाही भरवली. मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले हेडमास्टर झाले तर मनसे कार्यकर्ते विद्यार्थी झाले.

Raigad News: अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी

अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्डमध्ये पावसाचे पाणी शिरले असून या पाण्यातच रुग्णांवर उपचार सुरू आहेत सर्जिकल वॉर्डमध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दुरुस्तीसाठी सज्जे तोडल्याने पावसाचे पाणी वॉर्डमध्ये आल्याचा दावा सिव्हिल सर्जन डॉ. अंबादास देवमाने यांनी केला आहे.

Hingoli News: फायनान्स कंपनीकडून ४१ महिलांची फसवणूक; हिंगोलीतील प्रकार

हिंगोली जिल्ह्यात खाजगी फायनान्स कडून 41 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील या महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी फायनान्स कंपनीमधील कर्मचाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याआधी देखील सेनगाव तालुक्यामध्ये फायनान्स कंपनीने महिलांकडून हप्त्याच्या रकमेची वसुली करत फायनान्स कंपनीमध्ये रक्कम भरली नसल्याचा प्रकार पुढे आला होता.

Bhandara News: पहिल्याच पावसाने रस्ता वाहून गेला; नागरिकांची कसरत

 भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी या मार्गावरील जुनोना गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याची घटल्याच प्रकार घडला. त्यामुळे शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागत आहे.

Satara Pune Highway News: खंबाटकी घाटात ऑईल गळती; वाहनांचे किरकोळ अपघात

खंबाटकी घाटात रात्री उशिरा ऑईल घेऊन जाणाऱ्या टँकरमधून ऑईल सांडल्याने घाटात वाहनांचे किरकोळ अपघात होत आहेत. रात्री उशिरा अनेक गाड्या घसरून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. पोलीस प्रशासनाकडून घाटातील पुण्याकडून सातारकडे जाणारी वाहतूक एकाच लेनने संथ गतीने सुरू आहे.

Raigad Rain News: अलिबागमध्ये पावसाची बॅटिंग; जनजीवन विस्कळित

  रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. अलिबागमधील चेंढरे गाव परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती नियंत्रणात प्रशासनाला यश आले आहे.

Nashik Hit And Run Case: नाशिक हिट अँड रन केस: अवैद्य मद्यतस्कर अटकेत 

8 जुलैला चांदवड मनमाड महामार्गावर मद्यतस्करांच्या वाहनाच्या धडकेत उत्पादन शुल्कच्या एका जवानाचा झाला होता. या हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात अखेर नाशिक ग्रामीण पोलीसांना यश आले असून अवैध मद्यतस्कर प्रकरणात मुख्य मद्य वितरकास बेड्या ठोकल्या आहेत. राहुल ज्योती सहानी असे मद्य तस्कराचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून नाशिकच्या ग्रामीण गुन्हे शोध पथकाने सिल्वासा येथून ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! पुढील आठवड्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार? 

पुढील आठवड्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सर्वात महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता असून आजची राष्ट्रवादीची दिल्लीवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगानेच असल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना; महायुतीच्या वरिष्ठांची भेट घेणार

विधानपरिषद निवडणुकीनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये ते महायुतीच्या वरिष्ठांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यांतील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने ही भेट असण्याची शक्यता आहे.

Babanrao Taywade On Manoj Jarange Patil: 'मराठा- ओबीसी संघर्ष झाला तर मनोज जरांगे जबाबदार', बबनराव तायवाडे

"सरकारमधील एखाद्या मंत्र्याच्या विरोधात ओबीसी नेत्याच्या विरोधात अशा पद्धतीची आरोप करत असतील तर त्याचा निषेध करतो. उद्या मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण झाला आता त्याला पूर्णपणे मनोज जरांगे पाटील हे जबाबदार राहतील.वारंवार एखाद्या व्यक्तीची बद्दल बोलून त्या व्यक्तीची समाजात प्रतिमा मलीन करणे हे त्यांना शोभत नाही," असे म्हणत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

Manoj Jarange Patil Rally: मनोज जरांगेंची शांतता रॅली; छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा बांधव एकवटले!

मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजी नगर शहरात समारोप होत असून यासाठी जिल्हाभरातून समाज बांधव हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. तर काही समाज बांधवांनी देखील या समारोप प्रसंगी ट्रॅक्टरची रॅली सुद्धा संभाजीनगर शहरात दाखल झालेली आहे. ट्रॅक्टर वर भोंगे लावून आणि भगवे ध्वज लावून समाज बांधव जनजागृती करत करत शहरात दाखल झालेले आहेत. दरम्यान आजच्या रॅलीसाठी जय्यत तयारी संभाजी नगरात करण्यात आली असून मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटणार आहे.

Pandharpur News: धक्कादायक! शालेय पोषण आहारात आढळलं मेलेलं बेडूक

पंढरपुरात पोषण आहारामध्ये मेलेली बेंडकुळी सापडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे लहानग्या जीवाशी शासनाचा खेळ सुरूचा प्रकार समोर आला आहे. शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना आहे पण ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Congress MLA Cross Voting: काँग्रेसचे ७ आमदार फुटले; हायकमांड कारवाई करणार?

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 7 आमदार फुटले. विदर्भातील 1, मराठवाडातील 3 आमदार, उत्तर महाराष्ट्रातील 2 आमदार तर एक मुंबईतील 1 आमदार फुटला असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्ष या ७ आमदारवर काँग्रेस हाय कमांड लवकरच कारवाई करणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन देणार आहे. काँग्रेस हाय कमांडकडे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची शिफारस ही नाना पटोले करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

 Ratnagiri News : रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान; आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू, 9 जनावरे दगावली

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसामुळे अडीच कोटींचं नुकसान झालं आहे. 1 जून ते 11 जुलै या कालावधीत हे नुकसान झालंय. कच्ची घरे पक्की घरे सार्वजनिक मालमत्ता खाजगी मालमत्ता मयत जनावरे आणि दुकाने याचं नुकसान झालं आहे. पावसामध्ये 3 जणांचा मृत्यू तर नऊ जनावरे दगावले असल्याची नोंद आहे.

Nandurbar News : तब्बल ७ दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबारमध्ये पावसाला सुरुवात, शेतीकामांना वेग

तब्बल ७ दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेती कामांना आणखीन वेग येणार आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे काम मंदावले होते. मात्र आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याने खरीप हंगामाच्या पिकांना फायदा होणार होणार आहे. मात्र जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने धरण क्षेत्रांमध्ये अल्पसा पाणीसाठा आहे. जिल्हावासीयांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Prakash Ambedkar : संविधानावर खरचं प्रेम असेल, तर PM मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी - प्रकाश आंबेडकर

मुंबई : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी संविधानावर वार केले आहेत. तसेच, वेळोवेळी उपेक्षित, वंचित जाती आणि समाजाचे शोषण केले आहे.

बाबासाहेबांचे आदर्श आणि संविधानातील मूल्यांना काँग्रेस आणि भाजपने भ्रष्ट केले असल्याचेही ॲड.आंबेडकर म्हणाले.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातील पेडणे तालुक्यातील मालपे भागात महामार्गावर दरड कोसळल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या जून्या महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. नवीन महामार्गावर दरड कोसळत असल्यामुळे याची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

या कामात ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करून योग्य ती चौकशी केली जाईल. आवश्यकता असल्यास कारवाई करू असं म्हटलं आहे. मात्र महामार्गावर दरड कोसळल्याने अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्या अडकल्या असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News : मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई गोवा-महामार्गावरील बांदा इन्सुली चेकपोष्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. वाहन तपासणी दरम्यान केलेल्या कारवाईत एका कंटेनरमध्ये बोगस सील लावून वाहतूक होत असताना गोवा बनावटी दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत विदेशी मद्याचे एकूण 600 बॉक्स जप्त करण्यात आले.

यावेळी कंटेनरसह एकूण 83 लाख रुपये किंमतीचा मुद्देदमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक कृष्णा दिलीप गर्जे (कळंबोली रायगड) याला ताब्यात घेण्यात आले असून या आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जुलै 2024 महिन्याअखेर एकूण 6 वाहने जप्त केलेली असून गोवा बनावटी मद्याचा एकूण 1 कोटी 31 लाख रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.

Kalyan News : कल्याण-नगर मार्गांवरील शहाड ब्रिजवर धावत्या कारने घेतला पेट

कल्याण-नगर मार्गांवरील शहाड ब्रिजवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. कारला आग लागल्याचे समजताच कार चालकासह कारमध्ये असलेल्या 3 जणांनी कारमधून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे जीवितहानी टळली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाची टीम घटना स्थळी दाखल झाली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मात्र मोठं नुकसान झालंय.

Raigad News :  महाडच्या लाडवली येथे शेतकऱ्यांचा पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास

महाड ते रायगड मार्गावर लाडवली येथे शेतकऱ्यांना नदीपात्रातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि बांधकाम ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे लाडवली येथील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.

पुलाचे काम सुरू असल्याने नदीतून काढलेल्या पर्यायी मार्गावरून सद्या वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मोठा पाऊस झाला कि या पर्यायी मार्गावरून नदीचे पाणी वाहत आहे. सध्या भात लावणीची कामे सुरू असून नदी पात्रापलिकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी मार्गाने वळसा मारून शेतावर जाणे वेळखाऊपणाचे ठरत असल्याने येथील शेतकऱ्यांना हा मार्ग अवलंबला आहे.

Pune Rain News : पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात, नागरिकांची तारांबळ

पुण्यात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून सकाळपासून काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागानूसार यंदा चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पण जून महिन्यापासून आतापर्यंत चांगला पाऊस झालेला नाही.

धरण क्षेत्रातही अजून जोरदार पाऊस झाला नाही. पण आता पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काल हलका मध्यम स्वरूपाच्या पाऊस शहरात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.दरम्यान, पुण्यात येत्या १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आला.

Nashik News : नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज दिवसभर राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज शनिवारी दिवसभर बंद राहणार आहे. तसेच उद्या रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. गंगापूर आणि मुकणे धरणाच्या जलवाहिनी जोडणी गळती थांबवणे आणि वीज उपकेंद्रातील कामांसाठी पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mumbai Rain News : मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस, नागरिकांचा खोळंबा

Summary

मुंबईसह उपनगरात शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. सध्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण, दादर, भिवंडीसह परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहेत. पावसाचा परिणामी लोकल ट्रेनवर देखील झाल्याचं कळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com