Pik Vima Yojana: शेतकऱ्यांना दिलासा! पिकविमा योजनेच्या अर्जासठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?

Maharashtra Pik Vima Yojana: सरकारने शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना राबवली आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.
Pik Vima Yojana
Pik Vima YojanaSaam Tv
Published On
Summary

पीकविमा योजनेसाठी मुदतवाढ

३० ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

तांत्रिक बिघाडामुळे मुदत वाढवली

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. यामध्ये काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर काही योजनांमध्ये पीकविमा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळते. दरम्यान, पंतप्रधान पीकविमा योजनेला (Pik Vima Yojana) मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे. आता शेतकरी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पंतप्रधान पीकविमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Pik Vima Yojana
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालू खरीप हंगामासाठी ही योजना राबवली जात आहे. तांत्रिक अडचणींमुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी pmfby.gov.in पोर्टलवर, बँक किंवा विमा प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स अॅप अथवा सीएससीमार्फत नोंदणी करावी, असं सरकारने सांगितलं आहे.

Pik Vima Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा हप्ता या दिवशी येणार

जळगावमधील पीमविमाधारक शेतकऱ्यांची संख्या घटली

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात यंदा खरीप पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पीकविमा ही योजना गुंडाळून नवी पीकविमा योजना लागू केल्यानंतर शेतकऱ्यांचा या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आता राज्य शासनाने या नव्या योजनेसाठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत आता १४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. जळगाव जिल्ह्यातील केवळ २ लाख १० हजार शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीकविमा उतरवला आहे. मुदतवाढ मिळाल्यानंतर, ५ ऑगस्टपर्यंत ही संख्या २ लाख ३९ हजारांपर्यंत पोहोचली आहे.

Pik Vima Yojana
PM Kisan Yojana: ९.७ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज ₹२००० खात्यात जमा झाले; पैसे आले की नाही असं करा चेक
Q

पीक विमा योजना कधी सुरु झाली? (When Pik Vima Yojana Started)

A

प्रधानमंत्री पीक विमा योजना एप्रिल २०१६ मध्ये सुरु करण्यात आली.

Q

पीक विम्यासाठी कोणती पिके पात्र आहेत?

A

तृणधान्ये, बाजरी, डाळी, तेलबिया आणि बागायती पिकांवर तुम्हाला विमा मिळतो.

Q

महाराष्ट्रात पिक विमा २०२५ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

A

पिक विमा योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Q

पीक विम्यासाठी अर्ज कसा करावा?

A

तुम्ही pmfby.gov.in पोर्टलवर जाऊन पिक विम्यासाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com