
सुशील थोरात, साम प्रतिनिधी
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातील गावात आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एका गावाच्या ग्राम पंचायतीने कोल्ड्र ड्रिंकवर बंदी घातलीय. तर दुसऱ्या एका गावातील ग्रामपंचायतीने आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना दणका दिलाय. जे व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा म्हातारपणात सांभळ करत नाहीत त्यांना वारसा नोंद न देण्याचा निर्णय या ग्रामपंचायतने घेतलाय. या दोन्ही गावाच्या निर्णयाने अख्या राज्यापुढे आदर्श ठेवलाय. नेमका कोणत्या गावात कोल्ड्र ड्रिंकच्या विक्रीला बंदी घालण्यात आलीय आणि कोणत्या गावात वारसा नोंद न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, हे जाणून घेऊ.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतने एनर्जी ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. पेडगावातील एका मुलाने प्रमाणापेक्षा जास्त एनर्जी ड्रिंकचं सेवन केलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. या बाब लक्षात पेडगाव ग्रामपंचायतीने एनर्जी ड्रिंक आणि कोल्ड ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घातलीय. याबाबत पेडगावचे सरपंच इरफान पिरजादे म्हणाले, काही दिवसापूर्वी एक शाळकरी मुलाला एनर्जी ड्रिंक सेवन करण्याचं व्यसन लागलं होतं. एकदा त्याने प्रमाणापेक्षा एनर्जी ड्रिंकचं सेवन केलं होतं. त्यात त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर गावातील महिला आणि पुरुषांनी बैठक घेतली. त्यानंतर गावातील ग्रामस्थांची बैठक घेत शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने आई-वडिलांना न सांभाळणाऱ्यांना दणका देणारा निर्णय घेतलाय. जे व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा सांभाळ कर नाहीत , त्यांना ग्रामपंचायतीमध्ये वारसा नोंद देण्यात येणार नाही, असा निर्णय उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा गावाने घेतलाय. गावातील गावकऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिलाय. गावातील ज्येष्ठ नागरिकांना मुलांनी संभाळलं नाही तर युवकांना फटका बसणार आहे.
तळे हिप्परगा या गावात पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या आहेत. तर एक ते दीड हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. आई-वडिलांना वृद्धापकाळात त्रास होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच गावाचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी गावात होर्डिंग्स आणि डिजिटल बॅनर्स न लावण्याचाही ठराव करण्यात मंजूर आलाय. तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने आई-वडिलांसाठी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तळे हिप्परगा गावातील ग्रामस्थ रतिकांत पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय.
या निर्णयाबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, ग्रामपंचायतने हा धाडसी निर्णय घेतलाय. मुलासाठी आई-वडील आयुष्य कष्ट घेत असतात, आणि त्यांच्या म्हातारपणी तेच मुल त्यांना घराबाहेर काढत असतात. त्या वृद्धाच्या मनाला होणारा त्रास आपण सांगू शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रात असा निर्णय घेणारं तळे हिप्परगा गाव हे पहिले आहे, त्यामुळे हा धाडसी निर्णय असल्याची माहिती त्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.