MSEDCL News
MSEDCL NewsSaam tv

Maharashtra News: वीज वितरण कर्मचाऱ्यांचा संप..राज्‍यातील अनेक भागात अंधार; कर्मचाऱ्यांची निदर्शने

वीज वितरण कर्मचाऱ्यांचा संप..राज्‍यातील अनेक भागात अंधार; कर्मचाऱ्यांची निदर्शने

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आजपासून 72 तासासाठी संपावर गेले आहे. महावितरणचे कर्मचारी उपोषणावर जाणार असल्याने याच्या सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीच्या (MSEDCL) ग्राहकांना होणार आहे. महाराष्ट्रातील 30 संघटना उपोषणावर आहेत. (Live Marathi News)

नंदुरबारमधील दीड हजार कर्मचारी सहभागी

वीज कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या 72 तासांच्या संपात (Nandurbar News) नंदुरबारमधील पंधराशेहुन अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. आतापर्यत कुठल्याही गावाचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला नाही. दरम्यान शहादामध्ये आज संपादरम्यान विज कर्मचाऱयांनी वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

MSEDCL News
Accident News: साखरपुडा आटोपून परततांना अपघात; मुलादेखत आईचा ट्रकखाली सापडून मृत्‍यू

परभणीत महावितरणचे कर्मचारी शंभर टक्के संपात

राज्यात सुरू असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद (Parbhani) परभणीतही पडले आहेत. परभणीमध्ये देखील महावितरणचे १०० टक्‍के कर्मचारी आज संपामध्ये सामील झाले आहेत. संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिंतूर रोड येथील महावितरणच्या कार्यालयासमोर मंडप टाकून आंदोलन केले. आंदोलना दरम्यान राज्य सरकारने महावितरणचे खाजगीकरण साठी उचललेले पाऊल त्वरित मागे घ्यावे; अशी मागणी केली असून अदानी व सरकार विरुधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली.

अमरावतीः रात्रीपासून काही भागात अंधार

विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा अमरावतीमध्ये संप सुरू असून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती जिल्ह्यातील दोन हजार विज वितरण कंपनीचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. अमरावती येथील मुख्य अभियंता कार्यालयाबाहेर विज विभागाचे अधिकारी- कर्मचारी धरणे देत आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. अमरावती शहरातील लक्ष्मी नगरात रात्रीपासून विज नसल्याने अनेकांचे हाल होताय. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही गावातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती आहे.

रत्नागिरीत कर्मचाऱ्यांची निदर्शने

महावितरणच्या खासगीकरण विरोधात महाजेनको व वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालाअसून केंद्र व राज्य सरकारचा खासगीकरणाचा डाव यशस्वी होऊ न देण्याचा निर्धार यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आज सकाळी खेड येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. आज सकाळपासून तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत असून काही ठिकाणी मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील 72 तासात वीज पुरवठा सुरळीत राहील की नाही याची मात्र कोणीच शाश्वती देत नाहीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com