BMC Election: महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मनसेचा प्लॅन A,B,C; काय आहे राज ठाकरेंची रणनीती?

MNS A, B,C For Mumbai Municipal Elections: युती, आघाडी झाली तरीही निवडणुकांना कसं सामोरे जाता, येईल याबाबत मनसेकडून चाचपणी करण्यात आलीय. निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्लॅन ए,बी,सी तयार करण्यात आलाय.
MNS A, B,C For Mumbai Municipal Elections
Raj Thackeray sets political tone with Plan A, B, C as MNS preps for Mumbai civic polls
Published On

आगामी राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीकडून तयारी सुरू झालीय. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही कंबर कसली असून पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मनसेनं रणनिती आखली आहे. मनसेनं या निवडणुकांसाठी तीन प्लॅन तयार ठेवले आहेत.

मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वातावरण तापवलंय. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा एल्गार करत राज ठाकरेंनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मुंबईसह राज्यात मराठी भाषाचा मुद्दा मनसेनं लावून धरलाय. त्याच दरम्यान मनसेनं महानगरपालिकेसाठी जोरदार तयारी चालू केलीय. बीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसे अॅक्शन मोडवर आली असून मुंबईतील जागांची चाचपणी सुरू करण्यात आलीय.

त्यापार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत युती होवो किंवा नाही, तरीही मनसेकडून तयारी करण्यात येत आहे. मनसेकडून प्लॅन ए, बी, सी तयार करण्यात आले आहे. मनसेच्या नेत्यांकडून विभागानिहाय जागांची चाचपणी केली जातेय. त्याचा आढावा घेतला जात आहे. महापालिकेच्या निवडणुकांना कसं सामोरे जावे याची रणनिती पक्षाकडून ठरवण्यात आलीय.

MNS A, B,C For Mumbai Municipal Elections
Rohit Pawar: अजितदादांचा मंत्र्यांवर कंट्रोल नाही का? रोहित पवारांचा संतप्त सवाल

काय आहे मनसेचा प्लॅन ए,बी, सी?

निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्लॅन ए, बी, सी तयार करण्यात आलाय. यात युती झाल्यानंतर काय परिणाम होतील. युती नसेल तर काय परिणाम होणार. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनसेनं युती केली तर त्याचा काय परिणाम होईल. जर एकट्यानं निवडणूक लढवली तर काय होईल, याबाबत चर्चा करण्यात आलीय.

MNS A, B,C For Mumbai Municipal Elections
महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा?

मनसेनं तसे प्लॅन तयार केली आहेत. युती, आघाडी झाली तरीही निवडणुकांना कसं सामोरे जाता येईल याबाबत मनसेकडून चाचपणी करण्यात आलीय. पण जर कोणतीच युती झाली तर निवडणुका कशा लढायच्या याबाबत चर्चा झाली असून त्याचा प्लॅन तयार करण्यात आलाय. युती, आघाडीवर अवलंबून बसायचं नाही, असं ठरवत मनसेनं सर्वच दृष्टीने तयारी सुरू केलीय. मुंबईतील जागांसाठी चाचपणी सुरू करण्यात आलीय.

शिंदे गटाचे नेते उदय सामंत घेणार राज ठाकरेंची भेट

विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर शिंदे गटाचे टेन्शन वाढले होते. उद्धव ठाकरेंनी त्या मेळाव्यात युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे राज्यातील राजकरणात मोठा बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाणार आहेत. युतीबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी शिंदे गटासोबत युतीबाबत रणनिती तयार केलीय. पुढील १० दिवसात उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com