Maharashtra : नांदेडमध्ये १५०० मतदारांना डांबून ठेवले, भाजप आमदारावर आरोप, राज्यात कुठे काय झालं?

Maharashtra Local Body Election Voting : महाराष्ट्रातील २३ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान सुरू असताना नांदेड, अंबरनाथ आणि कोपरगावमध्ये गोंधळ उडाल्याचे प्रकार समोर आले आहेत. मतदारांना डांबून ठेवणे व पैसे वाटपाचे आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Maharashtra : नांदेडमध्ये १५०० मतदारांना डांबून ठेवले, भाजप आमदारावर आरोप, राज्यात कुठे काय झालं?
Maharashtra Local Body Election VotingSaam Tv
Published On
Summary
  • राज्यातील 23 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आज मतदान

  • नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप

  • अंबरनाथ व कोपरगावमध्ये राजकीय पक्षांमध्ये राडा

  • पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनुचित प्रकार टळला

  • मतदान केंद्रांवर काही काळ तणावाचे वातावरण

राज्यात उरलेल्या २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी १४३ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. मात्र राज्यातील काही ठिकाणी मतदान पार पडत असताना एकच गोंधळ उडाला आहे. नांदेडमध्ये एका आमदाराने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दीड हजार मतदारांना डांबून ठेवलं असल्याचा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या धर्माबाद नगरपालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना, सकाळपासून एका आमदाराने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आला. इनानी मंगल कार्यालयात जवळपास हजार ते दीड हजार मतदारांना डांबून ठेवण्यात आले होते. मतदारांना पैशाचे आमिष दाखवून, दाबून ठेवल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार हा लोकशाहीची हत्या असून आमदार आणि आमदारांच्या पत्नीला धर्माबाद मधून हद्दपार करण्याचे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे.

Maharashtra : नांदेडमध्ये १५०० मतदारांना डांबून ठेवले, भाजप आमदारावर आरोप, राज्यात कुठे काय झालं?
Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

तर दुसरीकडे अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात भाजपने मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपाखाली शिवसेना आणि भाजपमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून गोंधळ घालणाऱ्यांवर सौम्य लाठी चार्ज केला. त्यामुळे या परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. मात्र घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं वृत्त आहे.

अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप असल्याने दोन्ही गटात जोरदार राडा झाला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले. यावेळेस मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com