MAHARASHTRA MUNICIPAL ELECTIONS: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला निवडणूक आयोग लागलेय. आयोगाकडून मुंबई मनपा वगळता पुणे, नागपूरसह राज्यातील ९ महानगरपालिकेत प्रभाग रचना बदलण्यात येणार आहे. कोर्टाने काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते, पण पावसाळा असल्यामुळे निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली असून राज्य सरकारने प्रभाग रचना करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे. पण यामधून मुंबईला वगळण्यात आले आहे.मुंबईत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात जवळपास २८ महापालिकामध्ये निवडणुका होणार आहेत. मुंबई वगळता इतर महापालिकामध्ये प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. महापालिकांमध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे,याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
अ, ब, क आणि ड वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश राज्य सरकारने आयोगाला दिले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. लोकसंख्यानुसार, अ, ब आणि क वर्ग ठरवण्यात येणार आहेत.
अ वर्ग महानगरपालिका - पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका - ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका - नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
ड वर्ग महानगरपालिका - अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी, जालना
अशी होणार प्रभाग रचना
- महापालिकेतर्फे प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार
- ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवली जाणार
-प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर त्यावर हरकती व सूचनांवर मागवून सुनावणी होणार
- सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवली जाणार
- त्यास मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.