Maharashtra Rain: पुढील ५ दिवस महत्वाचे! २९ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस बरसणार; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alerts 2023: बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात सगळीकडे पाऊस पडेल.. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Maharashtra Rain News: एकीकडे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र अद्याप काही भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. आता येत्या २९ जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच विभागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहण्याचे संकेत पुणे वेधशाळेने वर्तवले आहेत. (Maharashtra Rain Updates)

Maharashtra Rain
Petrol Diesel Price 26 July: कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला असून गुजरातमधील कच्छ परिसरात वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ओदिशाच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात सगळीकडे पाऊस पडेल.. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट...

आगामी पावसाचे संकेत पाहता हवामान खात्याकडून पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपुर्ण विदर्भासह नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain
Farmers News: बळीराजाच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित; तक्रारींचे तात्काळ निवारण होणार

दरम्यान, सध्या मुंबई परिसर आणि कोकणातील अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली असली तरी या तुफान पावसाने महाराष्ट्राची यंदाची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर छोट्या धरणांचे दरवाजे उघडावे लागणार असून लवकरच हा सगळा प्रचंड पाणीसाठी मोठ्या धरणांमध्ये जाईल. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com